IPl 2023 : Rinku Singh | आयपीएलमधील ‘या’ संघाला आज होत असेल पश्चाताप, लिलावावेळी… अवघ्या इतक्या लाखांमध्ये रिंकू केकेआरमध्ये!

तुम्हाला माहित आहे का केकेआर संघाने रिंकूला किती रुपयांमध्ये आपल्या ताब्यात सामील करून घेतलंय. रिंकूला लागलेल्या बोलीचा आकडा ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण खरं आहे रिंकूला काही मोठी बोली लागली नाही.

IPl 2023 : Rinku Singh | आयपीएलमधील 'या' संघाला आज होत असेल पश्चाताप, लिलावावेळी... अवघ्या इतक्या लाखांमध्ये रिंकू केकेआरमध्ये!
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 10:40 PM

मुंबई : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात केकेआरने टायटन्सचा पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला युवा खेळाडू रिंकू सिंग. या पठ्ठ्याने शेवटच्या ओव्हर मध्ये एक दोन नाहीतर सलग पाच सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. हा विजय साधासुधा नाहीतर सर्वांच्या कायम आठवणीत राहणारा आहे. पण तुम्हाला माहित आहे का केकेआर संघाने रिंकूला किती रुपयांमध्ये आपल्या ताब्यात सामील करून घेतलंय. रिंकूला लागलेल्या बोलीचा आकडा ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण खरं आहे रिंकूला काही मोठी बोली लागली नाही.

आयपीएलच्या लिलावामध्ये रिंकू सिंग याची बेस प्राईज ही फक्त 20 लाख इतकी होती. तर लिलावामध्ये केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चुरस सुरू होती. केकेआरने सुरुवातीला पंचवीस लाख रुपयांची बोली लावली त्यानंतर लखनऊने तीस लाख रुपयांची, दोन्ही संघ पाच पाच लाख रुपयांनी किंमत वाढवत गेले अखेर केकेआरने 55 लाख रुपयांना रिंकू सिंग याला पुन्हा एकदा आपल्या संघात माघारी घेतलं होतं.

लखनऊ संघाला कदाचित आज पश्चाताप होत असावा की त्यावेळी जर आणखी प्रयत्न केला असता तर रिंकू सिंग आज त्यांच्या संघात असता. कोलकाता संघाने रिंकू सिंगला ज्या-ज्या वेळी खेळण्याची संधी दिली त्यावेळी त्यांनी आपलं पूर्ण 100 टक्के देत अनेकवेळा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मात्र आज त्याने लक्षच नाहीतर आयपीएलच्या इतिहासामध्ये कामगिरीची नोंद केली आहे.

रिंकूने हिटमॅन आणि माहीची मोडला रेकॉर्ड 

मॅचमधील 20 व्याओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर टिकून राहत रिंकूने संघाला विजय मिळवून दिला. त्यासोबतच भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. 2009 मध्ये रोहित शर्माने केकेआर विरुद्ध शेवटच्या शतकात 22 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तर दोन्हीने 2016 साली पंजाब विरुद्ध बावीस धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.