टी20 क्रिकेटच्या 20 व्या षटकात रिंकु सिंहची कमाल, 300 च्या स्ट्राईक रेटने केल्या इतक्या धावा
भारत झिम्बाब्वे दौरा नुकताच संपला असून यात टीम इंडियाने 4-1 ने बाजी मारली. या सामन्यात काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. तर रिंकु सिंहने आपल्या कामगिरीची छाप पाडली. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं.

झिम्बाब्वे दौऱ्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. टी20 वर्ल्डकपनंतर बऱ्यापैकी नवा संघ या दौऱ्यावर गेला होता. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाने कमबॅक केलं. तसेच पुढच्या चारही सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली. झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यात रिंकु सिंहला चार सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. यात त्याने 34 चेंडूंचा सामना केला आमि 60 धावा केल्या. यात त्याचा स्ट्राईक रेट 176.47 इतका होता. यात त्याने 2 चौकार आणि 6 षटकार मारले. नाबाद 48 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली. शेवटच्या सामन्यात रिंकु सिंहच्या वाटेला फारसे काही चेंडू आले नाहीत. 9 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने त्याने 11 धावा केल्या. याच खेळीच्या जोरावर रिंकु सिंहने 20व्या षटकात आपला स्ट्राईक रेट 300 केला.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रिंकु सिंहच्या कामगिरी पाहता याचा अंदाज तुम्हाला येईल. रिंकु सिंहचा 20 व्या षटकात आक्रमक अंदाज राहिला आहे. त्याने 20 व्या षटकात आतापर्यंत 28 चेंडू खेळला आहे. या 28 चेंडूत त्याने 300 च्या स्ट्राईक रेटने 84 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 षटकार आणि 5 चौकार मारले आहेत.टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रिंकु सिंहने आतापर्यंत 15 डाव खेळले हेत. यात त्याने 176.27 च्या स्ट्राईक रेटने आणि 83.20 च्या सरासरीने 416 धावा केल्या आहे. यात त्याने 33 चौकार आणि 26 षटकार मारले. तर दोन अर्धशतकं ठोकली आहेत. यात नाबाद 69 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली.
रिंकु सिंहने आयपीएल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्या कामगिरीवर त्याला आयर्लंडविरुद्धच्या दौऱ्यात स्थान मिळालं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संधी मिळाली नाही. पण या स्पर्धेत राखीव खेळाडू होता. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला. मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. आता श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी