6,6,6 : सुपर ओव्हर ‘किंग’… आशिया कपदरम्यान रिंकू सिंहचा राडा, सुपर ओव्हरमध्ये सिक्सर्सची हॅट्रीक
Rinku Singh Hit Three Sixers : रिंकू सिंगने सुपर ओव्हरमध्ये सलग तीन सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. आता परत एकदा रिंकूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये सलग पाच सिक्सर मारत प्रसिद्धीमध्ये आलेला केकेआरचा खेळाडू रिंकू सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिंकू सिंह याने परत एकदा तसाच काहीसा कारनामा करून दाखवला आहे. रिंकू सिंगने सुपर ओव्हरमध्ये सलग तीन सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंग याने टीम इंडियाकडून डेब्यू केला असून आता ती टीम इंडियाचा भाग नाही. टीम इंडियाचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
कोणत्या सामन्यात मारले सिक्स
आयपीएलच्या धर्तीवर UP T20 neलीगचं आयोजन करण्यात आलं आहे. युपी टी-20 लीगमधील 31 ऑगस्टला खतरनाक सामना झालेला पाहायला मिळाला. या लीगमध्ये रिंकू मेरठ मावेरिक्स या संघाकडून खेळत आहे. काशी रुद्रस आणि मेरठ मावेरिक्स या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात रिंकूने हा कारनामा केला.
पाहा व्हिडीओ:-
Rinku Singh… sensational…
Stop considering him human now, he is in the LORD LEAGUE 🤴 @rinkusingh235 #RinkuSingh
— 𝙰𝚖𝚒𝚝 /अमित / અમિત (@Amit_raja12) September 1, 2023
टॉस जिंकत मेरठ मावेरिक्स प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 20 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून 181 धावा केल्या, यामध्ये माधव कौशिक याने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. यामध्ये रिंकूला अवघ्या 15 धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या काशी रुद्रस संघालाही 20 ओव्हरमध्ये 181 धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये काशी रुद्रस संघाने 16 धावा केल्या. यामध्ये कर्ण शर्मा याने एक फोर आणि एक सिक्स मारला. त्यानंतर मेरठ संघाकडून मैदानात मैदानात रिंकू सिंग उतरला होता. पठ्ठ्याने सलग तीन सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. काशी रुद्रस संघाचा बॉलर शिवा याला रिंकूने कमबॅक करण्याची एकही संधी दिली नाही.
दरम्यान, आयपीएलमध्ये रिंकू सिंग याने सलग पाच सिक्सर मारत संघाला विजय मिळवून दिला होता. गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाज यश दयाल याला त्याने पाच सिक्स मारले होते. त्यावेळी रिंकूची जगभरात चर्चा झालेली पाहायला मिळाली होती. आता परत एकदा रिंकूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.