Video : IND vs NEP 4, 6, 4, 6 : चीनमध्ये रिंकू सिंग याची तुफानी खेळी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Rinku singh Sixers Video : भारतासाठी उगवता तारा रिंकू सिंह याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तोडफोड फलंदाजी करत भारताला 200 टप्पा पार करून दिला. रिंकूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video : IND vs NEP  4, 6, 4, 6 : चीनमध्ये रिंकू सिंग याची तुफानी खेळी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 4:21 PM

मुंबई : भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 मिशनसाठी तयारी करत असताना एशियन गेम्समध्ये युवा खेळाडूंचा संघ पाठवण्यात आला आला आहे. ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाच्या कर्धारपदाची धुरा देण्यात आली आहे. एशियन गेम्समध्ये भारतीय संघाने नेपाळसोबत झालेल्या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारतासाठी उगवता तारा रिंकू सिंह याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तोडफोड फलंदाजी करत भारताला 200 चा टप्पा पार करून दिला. रिंकूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ -:

भारताने प्रथम फलंदाजी करताना नेपाळ संघासमोर 202- 4 धावांचं लक्ष ठेवलं होतं. यामध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने 100 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 7 षटकार जयस्वाल याने मारले. जयस्वालने पहिल्या ओव्हरपासून नेपाळच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं होतं. पठ्ठ्याने गोलंदाजांना पिसून काढत चांगला घाम काढला.

रिंकूने घेतलं फैलावर

सतराव्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल आऊट झाला होता आणि भारतीय संघाच्या 150 धावा झाल्या होत्या. रिंकूने तिथून आपला दांडपट्टा फिरवायला सुरू केला आणि धावसंख्या 200 पेक्षा जास्त केली. रिंकूने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. या आक्रमक खेळीमध्ये त्याने तब्बल चार सिक्सर आणि दोन चौकार मारले.

दरम्यान, भारताने हा  सामना फक्त 23 धावांनी जिंकला जर रिंकूने त्या धावा नसत्या केल्या तर भारताचा पराभव निश्चितच होता. रिंकूने केलेल्या 37 धावा भारतीय संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या. त्यासोबतच शिवम दुबे याच्याही 25 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं.

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (C), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने

भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (W), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.