Rinku Singh | 6,6,6,6,6, रिंकु सिंहने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्स मारत टीमला जिंकवलं
रिंकु सिंह याने कोलकाता नाईट रायडर्सला गमावलेला सामना जिंकून दिला. रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचत गुजरातच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला.
अहमदाबाद | नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत गुजरात टायटन्सचा पराभव झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 25 वर्षाचा युवा रिंकु सिंह याने केलेल्या चमत्काराच्या जोरावर गुजरात जायंट्सचा त्यांच्या घरच्यात मैदानात पराभव केला आहे. गुजरातने कोलकाता विजयासाठी 205 रन्सचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने सामन्यात कमबॅक केलं होतं. मात्र राशिद खान याने घेतलेल्या हॅटट्रिकमुळे गुजरातचा पराभव निश्चित झाला होता. मात्र रिंकु सिंह याने कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 25 पेक्षा अधिक धावांची गरज असताना 5 कडक सिक्स ठोकत टीमला जिंकवलं आणि प्रतिस्पर्ध्यांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडलं.
गुजरात टायटन्सने टॉस जिंकून कोलकाताला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं. कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी 100 धावांची शतकी भागीदारी केली. कोलकाताने सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. मात्र नितीश राणा 45 धावांवर आऊट झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने एकबाजू लावून धरली. वेंकटेश चांगला खेळत होता. पण वेंकटेश यानेही 83 धावांवर आऊट होत मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यामुळे कोलकाताची 4 बाद 154 अशी स्थिती झाली.
कोलकाताची सामन्यातून पिछेहाट झाली. यानंतर गुजरातचा हंगामी कॅप्टन राशिद खान ओव्हर टाकायला आला. राशिदने तो ज्यासाठी ओळखला जातो, ती कामगिरी त्याने कली. आपल्या फिरकीसमोर त्याने केकेआरच्या 3 धोकादायक फंलदाजांना आऊट करत हॅट्रिक घेतली. राशिदने कोलकाताच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये अनुक्रमे आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर या तिकडीला आऊट करत मोसमातील पहिली हॅटट्रिक घेण्याचा बहुमान मिळवला. त्यामुळे गुजरात जिंकणार हे निश्चित झालं होतं. पण मैदानात रिंकू सिंह नावाचा डेंजर फलंदाज होता.
शेवटच्या ओव्हरचा थरार
कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. रिंकू सिंह याच्यासोबत उमेश यादव हे दोघे बॅट्समन मैदानात होते. राशिदने यश दयाल याला ही ओव्हर टाकायला दिली. उमेश यादवने पहिल्या बॉलवर हुशारीने सिंगल काढत रिंकूला स्ट्राईक मिळवून दिली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं.
रिंकून पाठी पुढे न पाहता धडाधड बॅट फिरवायला सुरुवात केली. रिंकूने शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कोलकाताला जिंकवलं. रिंकूने 21 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरसह नाबाद 48 धावांची खेळी केली.
कोलकाताचा विजय आणि जल्लोष
????? ?????! ? ?
??? ???????? ?????! ⚡️ ⚡️
Take A Bow! ? ?
28 needed off 5 balls & he has taken @KKRiders home & how! ? ?
Those reactions say it ALL! ☺️ ?
Scorecard ▶️ https://t.co/G8bESXjTyh #TATAIPL | #GTvKKR | @rinkusingh235 pic.twitter.com/Kdq660FdER
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.