Video : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्याा टी20 सामन्यातील फलंदाजीचं रिंकू सिंहने सांगितलं रहस्य, सूर्यकुमार वारंवार सांगत होता की..

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारताने 5 गडी आणि 7 चेंडू राखून गमावला. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिका विजयसाठी आणि टीम इंडिया मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. असं असताना दुसऱ्या सामन्यात रिंकू सिंहची खेळी लक्षवेधी राहिली. या खेळीत त्याला सूर्यकुमार यादवची चांगली साथ मिळाली.

Video : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्याा टी20 सामन्यातील फलंदाजीचं रिंकू सिंहने सांगितलं रहस्य, सूर्यकुमार वारंवार सांगत होता की..
Video : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात रिंकू सिंहची जबरदस्त खेळी, सूर्यकुमार यादवने दिला होता असा कानमंत्र
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 4:47 PM

मुंबई : भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला टी20 सामना गमावला. या पराभवामुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. आता मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया धडपड करावी लागणार आहे. दुसऱ्या टी20 सामन्यातील पराभवाची कारणं शोधून आता टीम इंडियाला पुढे जावं लागणार आहे. या सामन्यात सलामीला आलेले शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल खातं न खोलता तंबूत परतले. त्यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांनी मोर्चा सांभाळला. संघाची धावसंख्या 180 वर पोहोचवण्यास मदत केली. पण पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला डाव 19.3 षटकांवरच थांबवण्यात आला. तर डकवर्थ लुईस नियमानुसार 152 धावांचं टार्गेट दक्षिण अफ्रिकेला देण्यात आलं. हे टार्गेट दक्षिण अफ्रिकेने 13.5 षटकात पाच गडी गमवून पूर्ण केलं. भारताने सामना गमवाला तरी रिंकू सिंहची खेळी लक्षवेधी ठरली. रिंकूने 39 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. या खेळीमागचं रहस्य त्याने सामन्यानंतर सांगितलं.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

“मी जेव्हा बॅटिंग करायला गेलो तेव्हा तीन गडी बाद झाले होते. तेव्हा परिस्थिती कठीण होती. सूर्यासोबत खेळत असताना तो फक्त इतकंच म्हणाला जसा खेळत आला आहेस तसाच खेळ. आपला गेम खेळ. मी थोडा वेळ घेतला. कारण खेळपट्टी समजून घेण्यात थोडा वेळ लागला. सेट झाल्यानंतर मोठे फटके मारले. सुरुवातीला हवी तशी बॅटिंग होत नव्हती, पण सूर्या म्हणाला शांत डोकं ठेव आणि आपला गेम खेळ. त्यानंतर सर्वकाही ठिक झालं. मी षटकार मारला तेव्हा मला माहितीच नव्हतं की काच तुटली. तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. त्यासाठी सॉरी..”

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा सामना रविवारी 14 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यातील जय पराजय मालिकेचा निकाल सांगणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया कसा कमबॅक करते याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, तिसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल आहे का? याकडेही लक्ष लागून आहे. ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळतं का? याबाबतही चर्चा रंगली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.