Video: एक स्वप्न पूर्ण, आता दुसरं बाकी, आयपीएल फायनलनंतर रिंकू सिंग काय म्हणाला?

Rinku Singh Dream: कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चॅम्पियन ठरली. केकेआरच्या या विजयानंतर रिंकू सिंहने आपणं स्वप्न जाहिररित्या सांगितलं.

Video: एक स्वप्न पूर्ण, आता दुसरं बाकी, आयपीएल फायनलनंतर रिंकू सिंग काय म्हणाला?
rinku singh ipl 2024 kkrImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 7:19 PM

एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रविवारी 26 मे रोजी श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने महाअंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. केकेआर तब्बल 10 वर्षानंतर आयपीएल चॅम्पियन ठरली. तसेच केकेआरची ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. केकेआरने 2012, 2014 नंतर आता आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. केकेआरला विजयी करण्यात अनेक युवा खेळाडूंचं योगदान राहिलं. रिंकू सिंह हा त्यापैकी एक. रिंकूने केकेआरच्या विजयानंतर जोरदार जल्लोष केला. ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आज पूर्ण झाल्याचं रिंकूने म्हटलं. रिंकूचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हीडिओत रिंकू धमला करताना दिसत आहे.

रिंकू सिंहने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हटलं एक स्वप्न पूर्ण झालंय. आता दुसरं स्वप्न पूर्ण होणं बाकी आहे. दुसरं स्वप्न म्हणजे टी 20 वर्ल्ड कप जिंकणं. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची पहिली तुकडी अमेरिकेत पोहचली आहे. तर लवकरच दुसरी तुकडी रवाना होणार आहे. अशात आयपीए ट्रॉफी जिंकल्यानंतर रिंकूने टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचं दुसरं स्वप्न असल्याचं म्हटलंय. टीम इंडियाने 2007 साली पहिलाच टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाची प्रतिक्षा अद्याप कायम आहे.

रिंकू सिंह काय म्हणाला?

“मी या टीमसोबत 7 वर्षांपासून आहे. मी एक मोठी ट्रॉफी जिंकावी, असं माझं स्वप्न होतं. आता एक ट्रॉफी जिंकलो आहे. आता एक ट्रॉफी बाकी आहे. वर्ल्ड कप ट्रॉफी माझ्या हातात असावी, अशी माझी आशा आहे”, असं रिंकू हैदाराबादवर मात केल्यानंतर म्हणाला.

दरम्यान टीम इंडियाच्या वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या मुख्य संघात 15 आणि राखीव म्हणून 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. रिंकू सिंहला दुर्देवाने मुख्य संघात स्थान मिळालं नाही. रिंकूचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे.

रिंकूचं दुसरं स्वप्न काय?

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.