‘बाहुबली रिषभ पंत’, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय?

रिषभ पंतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टीम इंडियाचे फरफॉर्मर एनालिस्ट हरी प्रसाद मोहन यांना रिषभने 360 अंशात गोल गोल फिरवलं. (Rishabh pant Gym Workout india Support Staff India tour of England tour)

'बाहुबली रिषभ पंत', टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय?
रिषभ पंत
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 7:06 AM

मुंबई :  भारताचा इंग्लंड दौरा येत्या काहीच दिवसांत सुरु होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. जीममध्ये घाम गाळत आहेत. विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतची (Rishabh pant) आतापर्यंत मैदानावरची कॉमेन्ट्री सगळ्यांनीच ऐकली असेल. आता रिषभचा नवीन गुण त्याने जगासमोर आणला आहे. भारतीय सपोर्ट स्टाफमधल्या एका व्यक्तीला तो आपल्या ताकदीच्या जोरावर 360 अंशात गोलगोल फिरवतोय, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.  (Rishabh pant Gym Workout india Support Staff India tour of England)

‘बाहुबली’ रिषभ पंत

रिषभ पंतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टीम इंडियाचे फरफॉर्मर एनालिस्ट हरी प्रसाद मोहन यांना रिषभने 360 अंशात गोल गोल फिरवलं. त्यांच्यासोबत रिषभची जीममध्ये मस्ती सुरु होती. या मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Rishabh pant instagram Story

Rishabh pant instagram Story

हरी प्रसाद यांची भन्नाट कमेंट

बाहुबली रिषभने त्याची ताकद दाखवून दिल्यानंतर हरी प्रसाद यांनी त्याला शब्दांची ताकद दाखवून दिली आहे. रिषभ सोबतचे 2 फोटो शेअर करत हरीप्रसाद यांनी मिश्किल अंदाजात 360 डिग्रीमध्ये गोल फिरायचं असेल तर रिषभशी ,संपर्क करु शकता, असं त्यांनी लिहिलं. फॅन्सना रिषभची मस्ती आणि हरीप्रसाद यांची कमेंट हा दोन्ही गोष्टी आवडल्या आहेत.

भारताचा इंग्लंड दौरा

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मुंबईत क्वारंन्टाईन आहे. 14 दिवसांपासून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 सदस्यीय भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडसाठी प्रयान करेल. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका भारताला इंग्लंड दौऱ्यात खेळायची आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी सगळे खेळाडू मुंबईत क्वारन्टाईन

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. अशा परिस्थितीत खेळाडूंना देखील काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार खेळाडूंना जवळपास 12 दिवसांचा क्वारन्टाईन पिरियड आखून दिला होता. त्यानुसार इंग्लंडला जाण्याआधी खेळाडू मुंबईत क्वारन्टाईन आहेत. मुंबईत भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

(Rishabh pant Gym Workout india Support Staff India tour of England)

हे ही वाचा :

World Test Championship : ‘मॅन ऑफ दी टूर्नामेंट’चा दावेदार कोण? अश्विनसह या दोन खेळाडूंमध्ये चुरस

World Test Championship : इंग्लंड दौऱ्याआधी कपील देव यांचा विराट कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला

WTC फायनल मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार ICC ची महत्त्वपूर्ण घोषणा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.