Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ बातमीबाबत ऋषभ पंतचं स्पष्टीकरण, एका झटक्यात ‘दूध का दूध, पानी का पानी’

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बऱ्याच वावड्या उठल्या आहेत. कोणत्या खेळाडू कोणत्या संघात जाणार याबाबत सोशल मीडियावर उलटसूलट चर्चा रंगली आहे. अशीच एक बातमी ऋषभ पंतबाबत पसरली आहे. याबाबत ऋषभ पंतने थेट खरं काय ते सांगून अफवांवर पडदा टाकला आहे.

'त्या' बातमीबाबत ऋषभ पंतचं स्पष्टीकरण, एका झटक्यात 'दूध का दूध, पानी का पानी'
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 7:38 PM

ऋषभ पंतने अपघातानंतर आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी करत आपला आक्रमक अंदाजही दाखवून दिला आहे. त्यामुळे ऋषभ पंत पुन्हा एकदा जुन्या रंगात परतल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. असं असताना सोशल मीडियावरील काही चर्चांमुळे ऋषभ पंतचा संताप झाला आहे. इतकंच काय तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. सत्य जाणून न घेता अशा बातम्या कशा काय पसरवू शकता? असा प्रश्नही विचारला आहे. ऋषभ पंतशी निगडीत एक पोस्ट सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.

व्हायरल पोस्टमध्ये ऋषभ पंत आरसीबी फ्रेंचायझीसोबत जाण्यास उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी व्यवस्थापकाद्वारे आरसीबी मालकाशी संपर्क साधल्याचं कथित पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे. इतकंच काय तर पंतला कर्णधार व्हायची अट ठेवली होती. मात्र ती अट आरसीबी व्यवस्थापनाने मान्य केली नाही. विराट कोहलीली पंत आरसीबीत यावं असं अजिबात वाटत नसल्याचंही पोस्टमध्ये लिहिलं आहे.आता याबाबत खुद्द ऋषभ पंतने एक्सद्वारे खुलासा केला आहे.

ऋषभ पंतने एक्सवर लिहिलं की, ‘खोटी बातमी. तुम्ही अशा खोट्या बातम्या सोशल मीडियावर का पसरवत आहात? हे पूर्णपणे चुकीचं आहे. विनाकारण लोकांमध्ये खोटं काही पसरवू नका. असं पहिल्यांदा घडलेलं नाही किंवा शेवटचं असेल असंही नाही. लिहिण्यापूर्वी तुमचे कथित सोर्स तपासा. दिवसेंदिवस स्थिती खराब होत आहे. बाकी हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांसाठी आहे. काळजी घ्या.’

आयपीएलमध्ये सध्या ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीकडून खेळत आहे. तसेच त्याला कायम ठेवणार असल्याची एक बातमी समोर आली आहे.  त्यामुळे पुढच्या पर्वातही ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल असं सांगण्यात येत आहे. आता मेगा लिलावापूर्वी नेमक्या काय घडामोडी घडतात? याकडे लक्ष लागून आहे. पण ऋषभ पंतच्या आरसीबीच्या अफवांवर मात्र पूर्णविराम लागला आहे.