आयपीएलचं 18 व्या पर्वापूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे फ्रेंचायझीमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं आणि कोणाला रिलीज करायचं याबाबत चर्चा सुरु आहे. 31 ऑक्टोबरपूर्वी सर्व फ्रेंचायझी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी समोर ठेवणार आहेत. त्यामुळे दिग्गज आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंना रिटेन करणार यात शंका नाही. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही फॉर्मात आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स त्याच्यावर पुन्हा विश्वास टाकणार यात शंका नाही. पण ऋषभ पंतबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात खळबळ उडाली आहे. आयपीएल 2024 पर्वात त्याने दिल्लीची कमान सांभाळली होती. पण एका वृत्ताने दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंत या पर्वात टीमचं नेतृत्व करण्यास तयार नाही. ऋषभ पंतने स्वत: याबाबत कर्णधारपद भूषविण्यास तयार नसल्याचं फ्रेंचायझीला कळवलं आहे. त्यामुळे संघात फक्त खेळाडू म्हणून असणार आहे.
ऋषभ पंतला 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार घोषित केलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये अपघातामुळे खेळू शकला नाही. त्यामुळे ही धुरा डेविड वॉर्नरच्या खांद्यावर दिली गेली. नुकतंच ऋषभ पंतच्या एका पोस्ट खळबळ उडाली होती. त्याने सोशल मीडियावर लिलावात उतरण्याबाबत संकेत दिले होते. पंतने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘जर मी लिलावात उतरलो तर मला कोण घेईल की नाही.. जर हा असेल तर कितीला’ या पोस्टनंतर ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स सोडणार या चर्चांना उधाण आलं होतं. काही रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. पण त्यात किती याबाबत काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे या निव्वळ चर्चा आहेत.
ऋषभ पंतचा हा निर्णय कायम असल्यास दिल्ली कॅपिटल्सला नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागेल. नुकतंच दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल झाला आहे. रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी सोडल्यानंतर हेमांग बदानीच्या हाती कमान सोपण्यात आली आहे. तसेच कोचिंग स्टाफमध्येही बदल पाहण्यात येत आहे.