आयपीएल लिलावात मिचेल स्टार्कचाही विक्रम हा खेळाडू मोडणार! जाणून घ्या कोण तो

आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. जेद्दाहमध्ये लिलावात उतरलेल्या 1574 खेळाडूंचा निर्णय होणार आहे. आतापर्यंत लिलावात 24.75 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लागली आहे. त्यामुळे यावेळी विक्रम मोडीत निघणार का? हा प्रश्न आहे. असं असताना एका खेळाडूकडे सर्वच फ्रेंचायझींच्या नजरा लागून आहेत.

आयपीएल लिलावात मिचेल स्टार्कचाही विक्रम हा खेळाडू मोडणार! जाणून घ्या कोण तो
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 4:08 PM

आयपीएल 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये पार पडणार आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे असून मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्सने फक्त दोन अनकॅप्ड प्लेयर्स रिटेन केले आहेत. इतर सर्व खेळाडूंना रिलीज केलं असून संपूर्ण संघ नव्याने बांधणार आहेत. पंजाब किंग्ससोबत दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स हे संघही नव्या कर्णधाराच्या शोधात आहेत. त्यामुळे संघाच्या कर्णधारासाठी लिलावात जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मेगा लिलावात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघतील असं दिसत आहे. मागच्या पर्वात मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये मोजले होते. यंदाच्या मेगा लिलावात हा विक्रम मोडीत निघेल अशी शक्यता आहे. मिचेल स्टार्कलाही कोलकात्याने रिलीज केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मेगा लिलावात दिसणार आहे. पण त्याला पुन्हा एकदा इतकी मोठी रक्कम मिळणं कठीण दिसत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या पर्वात जेतेपद जिंकलं पण त्यात मिचेल स्टार्कचा वाटा काही खास नव्हता. त्याच्यापेक्षा कमी पैसे घेणाऱ्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मिचेल स्टार्कला तितका भाव मेगा लिलावात मिळणं कठीण आहे. दुसरीकडे, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरले आहेत. हे तिन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषविलं आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंवर खासकरून फ्रेंचायझींचा नजरा असतील. आरटीएम कार्डचं ऑप्शनही असल्याने काय होईल सांगता येत नाही.

मेगा लिलावात सर्वाधिक भाव हा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत खाऊन जाईल असं बोललं जात आहे. ऋषभ पंत सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने शतकी खेळी करत आपली चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे ऋषभ पंतवर नजरा खिळल्या आहेत. खासकरून पंजाब किंग्स त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. या माध्यमातून एकाच दगडात दोन शिकार करता येतील. आता पंजाब किंग्ससोबत कोण तगडी बोली लावणार याची उत्सुकता आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.