आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी ऋषभ पंतसाठी आनंदाची बातमी, शतक ठोकताच फ्रेंचायझीने घेतला असा निर्णय

ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळीसह जबरदस्त कमबॅक केलं. 109 धावांची खेळी करून तोच ऋषभ पंत असल्याचं दाखवून दिलं. 2022 मध्ये झालेल्या अपघातानंतर ऋषभ पंतचं हे पहिलं शतक आहे. शतकी खेळीनंतर आयपीएल फ्रेंचायझीकडून आनंदाची बातमी मिळाली आहे.

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी ऋषभ पंतसाठी आनंदाची बातमी, शतक ठोकताच फ्रेंचायझीने घेतला असा निर्णय
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 5:59 PM

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या कसोटीतील विजयापासून टीम इंडिया फक्त 6 विकेट दूर आहे. तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी केली. यासह टीम इंडियाची मजबूत स्थिती आहे. 227 आघाडीसह भारताने पुढे खेळत 287 धावा केल्या आणि डाव घोषित केला. तसेच बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 4 गडी बाद 158 धावा केल्या आहेत. तसेच अजूनही 357 धावांची आवश्यकता आहे. ऋषभ पंतने कमबॅक कसोटीत 128 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. असं असताना दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीकडून ऋषभ पंतला आनंदाची बातमी मिळाली आहे. मागच्या पर्वात ऋषभ पंत दिल्लीची साथ सोडणार अशी अफवा उडाली होती. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. एका रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्सने या पर्वात ऋषभ पंतला संघात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पगारही वाढवण्यावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे.

क्रिकबजने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, जीएमआर स्पोर्ट्स आणि जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स मालकी हक्क असलेल्या फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने पंतला संघात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंचायझी मागच्या मेगा ऑक्शनप्रमाणे ऋषभ पंतला नंबर एक रिटेंशन ठेवणार आहे. त्यामुळे ऋषभ पंतच्या पगारात वाढ होईल. या बातमीसह ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स सोडणार या बातम्यांना पूर्णविराम लागला आहे. मागच्या काही दिवसात ऋषभ पंतबाबत बऱ्याच वावड्या उठल्या होत्या. ऋषभ पंत चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच रोहित शर्मा दिल्लीकडून खेळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

रिपोर्टनुसर, ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदल यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सर्व काही स्पष्ट केल्याचं सांगितलं जात आहे. ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून डेब्यू खेलं होतं. तसेच 2021 मध्ये त्याच्याकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अपघातामुळे 2023 पर्वात भाग घेतला नव्हता. पण त्याने 2024 स्पर्धेत कमबॅक केलं. पंतला सध्या प्रत्येक पर्वासाठी 16 कोटींची रक्कम मिळते. आता या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....