IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाला पुन्हा वादाची फोडणी! रोहित शर्माची पत्नी रितिकाने दिली अशी प्रतिक्रिया
आयपीएल 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. सर्वच संघ सज्ज असून मुंबई इंडियन्समध्ये काहीच आलबेल नसल्याचं वारंवार समोर येत आहे. खेळाडूंच्या क्रिप्टिक पोस्टनंतर रोहित शर्माची पत्नी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे बाजू मांडत आहे. आता पुन्हा एकदा रोहितची पत्नी रितिका व्यक्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या वादाला फोडणी मिळाली आहे.
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून बराच वाद पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात घेतलेल्या हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते नाराज झाल्याचं पाहायलं मिळालं. पण यावर रोहित शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. प्रकरण गेल्या काही दिवसांपासून थंड झालं होतं. पण मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाउचरने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्या व्हिडीओखाली रितिका सजदेह हिने कमेंट्स देत अप्रत्यक्षरित्या बरंच काही उघड केलं होतं. कमेंट्स बॉक्समध्ये रितिकाने ‘खूप काही चुकीचं आहे’ अशी कमेंट्स केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघात काहीतरी शिजत असल्याच्या बातम्यांना दुजोरा मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी रोहित शर्माने पत्नीची बाजू घेत एक कमेंट्स केली होती. आता पुन्हा एक रितिका सजदेह व्यक्त झाली आहे. यातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंडियन क्रिकेट कॉमेडी नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक कविता शेअर करण्यात आली आहे. या कवितेच्या कॅप्शनमध्ये ‘या सेल्फलेस कर्णधाराला आठवणीत ठेवाल ना’ असं लिहिलं आहे. ही कविता रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहच्या दृष्टीक्षेपात पडली आणि ती तात्काळ व्यक्त झाली. या कवितेखाली तिने इमोशनल रिएक्शन दिली आहे. इमोजी टाकत रितिका सजदेह व्यक्त झाली आहे. ही रिएक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या इमोजीचा अर्थ आपआपल्या पद्धतीने घेत आहे.
View this post on Instagram
कवितेच रोहित शर्माने शतक ठोकल्यानंतर सेलिब्रंट केलं नसल्याचं दाखवलं गेलं आहे. आयसीसी चषकासाठीचं दु:ख अजूनही कायम आहे. त्यानंतर रोहित शर्माने क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. राजकोट कसोटीत 3 बाद 33 धावा असताना. रोहित शर्माने 131 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि सरफराज खान यांनी मोर्चा सांभाळला. दिग्गज खेळाडू खेळत नसल्याचं उल्लेखही यात आहे. तसेच युवा खेळाडूंनी धुरा सांभाळली. त्याला कारणही रोहित शर्मा असल्याचं सांगितलं गेलं आहे.