Riyan Parag Video : सारा आणि अन्यया पांडेबद्दल स्टार क्रिकेटर रियान परागने यू-ट्यूबवर केलं नको ते सर्च, व्हिडीओ व्हायरल
Riyan Parag Leaked Video : राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू रियान पराग याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर रियान पराग याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार खेळाडू रियान पराग अडचणीत आला आहे. रियान पराग याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये रियान पराग हा बॉलिवुड अभिनेत्रींबाबत आक्षेपार्ह सर्च करत होता. रियान परागचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून साला अली खान आणि अनन्या पांडे या दोन अभिनेत्रींबाबत तो You Tube वर त्याने सर्च केलं होतं. नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
पाहा व्हिडीओ:-
Ananya Pandey hot” “Sara Ali Khan hot”
Riyan parag YT search history 😭#THEDANCEDAY #石井蘭の最強乱舞 #石井蘭 pic.twitter.com/pKicsuyQzM
— cutter 🔥🔥🔥 (@The_Ruler_of_X) May 27, 2024
नेमकं काय आहे प्रकरण?
रियान पराग एक गेमिंग चॅनल चालवतो, ज्यामध्ये तो लाइव्ह स्ट्रीमिंग करतो. या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान पराग यूट्यूबवर कॉपीराइट फ्री म्युझिक शोधत होता. त्याने सर्च बॉक्सवर क्लिक करताच त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे दिसतात आणि त्यापुढे हॉट लिहिलेले दिसले.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे रियानच्या यूट्यूब सर्च हिस्ट्रीवर दिसली, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पराग यंदा आपल्या बॅटींगमुळे चांगलाच चर्चेत होता, मात्र आता या वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे.
राजस्थान रॉयल्सकडून रियान पराग याने 15 सामन्यांमध्ये 149.22 च्या स्ट्राईक रेटने 573 धावा केल्या आहेत. तर यामध्ये 84 धावांची नाबाद खेळी केलीये. तर यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या सीझनमध्ये रियान परागने मधल्या फळीमध्ये फलंदाजील येत संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या. क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीविरूद्धही रियानने दमदार खेळी केली होती.