पाकिस्तानला धुळ चारणारा उथप्पा निवृत्त, विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, BCCIवरील नाराजी वाढतेय!

उथप्पाच्या या निर्णयावरुन आता वेगळीच चर्चाही रंगली आहे. ही बीसीसीआयवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय. 

पाकिस्तानला धुळ चारणारा उथप्पा निवृत्त, विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, BCCIवरील नाराजी वाढतेय!
पाकिस्तानला धुळ चारणारा उथप्पा निवृत्तImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 8:25 PM

मुंबई : टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केल्यानंतर नाराजी वाढत असल्याचं दिसतंय. जे खेळाडू कधी शर्यतीतही नव्हेत त्यांना संधी देण्याची आली, तर ज्या खेळाडूंनी पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला धुळ चारली त्याला संघापासून दूर ठेवण्यात आलं, असं बोललं जातंय. आज ही नाराजी समोर आल्याची चर्चा आहे. त्याचं कारणही तसंत आहे. आज दिग्गज क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. उथप्पाने एक निवेदन जारी करून भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. उथप्पाने 2006 मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, उथप्पाच्या या निर्णयावरुन आता वेगळीच चर्चाही रंगली आहे. ही बीसीसीआयवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय.

इंग्लंडविरुद्ध वनडेतून पदार्पण

उथप्पानं 2006 मध्ये इंदूर येथे इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सलामीला येताना उथप्पानं जोरदार फलंदाजी केली आणि 96 चेंडूत 86 धावा करून तो बाद झाला. त्यावेळी भारताच्या वनडेत पदार्पणाच्या सामन्यातील सर्वात मोठ्या खेळीचा हा विक्रम होता. उथप्पाच्या या खेळीच्या जोरावर भारताने त्या सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला.

उथप्पाचं ट्विट

आक्रमक फलंदाजी

2004 अंडर-19 विश्वचषकात शिखर धवनसह सर्वात यशस्वी सलामीच्या जोडीने प्रसिद्धीच्या झोतात आलेला यष्टिरक्षक फलंदाज उथप्पा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. यामुळे त्याला टीम इंडियातही स्थान मिळाले. उथप्पाने भारतासाठी 46 एकदिवसीय सामन्यांमध्ये 934 धावा केल्या आहेत, तर 13 टी-20 सामन्यात 249 धावा केल्या आहेत. उथप्पाने शेवटची निळी जर्सी 2015 मध्ये एकदिवसीय आणि टी-20 मध्ये भारतासाठी घातली होती.

पाकिस्तानला पराभूत करण्यात मोठी भूमिका

उथप्पाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण म्हणजे 2007 टी-20 विश्वचषक. त्या पहिल्या विश्वचषकात, पाकिस्तानविरुद्धच्या गट टप्प्यातील सामन्यात उथप्पाने टीम इंडियाच्या अत्यंत खराब सुरुवातीनंतर लढाऊ खेळी खेळून 39 चेंडूत 50 धावा केल्या. या जोरावर भारताने 141 धावा केल्या होत्या. सामना टाय झाला, त्यानंतर टायब्रेकर म्हणून ‘बॉल आऊट’चा निर्णय घेण्यात आला.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.