मुंबई: भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रॉबिन उथाप्पा (Robin uthappa) दुसऱ्यांदा पिता बनला आहे. रॉबिनची पत्नी शीतलने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. रॉबिन उथाप्पाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्याने पोस्ट मध्ये मुलीचा फोटो सुद्धा दाखवला. उथाप्पाने या मध्ये मुलीचं नाव काय ठेवलं, त्याची सुद्धा माहिती दिलीय. रॉबिन उथाप्पा आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळतो. रॉबिन उथाप्पाच्या मुलीचं नाव चर्चेत आहे. लोक या नावाचा अर्थ शोधतायत. आम्ही आमच्या आयुष्यात आलेल्या छोट्या परीशी तुमची भेट घडवून देतो. ट्रिनिटी थिया उथाप्पा असं त्याच्या मुलीचं नाव आहे.
उथाप्पाने मुलीच जे नाव ठेवलय, ते भरपूर सर्च केलं जातय. ट्रिनिटीचा अर्थ त्रित्व आहे. आयपीएलचा यंदाचा सीजन सुरु असतानाच शीतलने ती गर्भवती असल्याची माहिती दिली होती. शीतल स्वत: टेनिसपटू आहे. तिने वयाच्या 9 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. 33 व्या वर्षी तिने टेनिस मधून सन्यास घेतला.
कॉलेज मध्ये असताना तिची रॉबिन उथाप्पा बरोबर ओळख झाली होती. तेव्हा शीतल रॉबिनला सीनियर होती. दोघेही खेळाडू असल्याने त्यांच्यात मैत्रीचा धागा घट्ट होत गेला. 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. उथाप्पा आणि शीतलने आधी ख्रिस्ती परंपरेनुसार लग्न केलं. त्यानंतर हिंदू पद्धतीने विवाह केला. 2017 मध्ये दोघे पहिल्यांदा आई-बाबा बनले. त्यांच्या मुलाचं नाव नील नोलन आहे. रॉबिन आणि शीतल दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. केएल राहुल, प्रग्यान ओझा, इरफान पठान, अथिया शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्यात.