आयपीएल दरम्यान कपिल शर्मा शोमध्ये रोहित-श्रेयस अय्यरची हजेरी, दिलखुसापणे असं सांगितलं ओपनिंगबाबत

द ग्रेट इंडियन कपिल शोचा नवा प्रोमो नेटफ्लिक्सने शेअर केला आहे. यावेळी कपिल शर्मा शोमध्ये भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली. कपिल शर्माच्या प्रश्नांना रोहित आणि श्रेयस अय्यरने दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी रोहित शर्माची पत्नीही उपस्थित होती.

आयपीएल दरम्यान कपिल शर्मा शोमध्ये रोहित-श्रेयस अय्यरची हजेरी, दिलखुसापणे असं सांगितलं ओपनिंगबाबत
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 6:24 PM

द कपिल शर्मा शोने गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य केलं. या कार्यक्रमात दिग्गजांची हजेरी असते. तसेच हास्याचे फवारे उडवत त्यांच्या मनातील ओलावा समोर आणलं जातं. त्यामुळे या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. हसता हसता दिग्गजांबाबत बरंच काही उलगडलं जातं. द कपिल शर्मा शोचं नवं पर्व सुरु झालं आहे. या पर्वाच्या पहिल्या भागात कपूर फॅमिलीने हजेरी लावली होती. आता आयपीएल स्पर्धा सुरु असताना दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाची धुरा हाती असलेला श्रेयस या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. तसेच कपिल शर्माच्या रुपात नवज्योतसिंह सिद्धूनेही हजेरी लावली आणि कार्यक्रमाला रंगत चढली. द ग्रेट इंडियन कपिल शोचा नवा प्रोमो नेटफ्लिक्सवर शेअर केला आहे.

प्रोमोमध्ये कपिल शर्मा हा रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांचं स्वागत करताना दिसत आहे. तसेच कार्यक्रमाची रंगत वाढावी म्हणून कपिल शर्माने नवज्योतसिंह सिद्धूचं रुप धारण केलं. तसेच जज असलेल्या अर्चना पूरन सिंह हिची खूर्ची खेचण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या कार्यक्रमात चियर लीडर म्हणून डान्स करताना दिसले. तसेच दोघांनी कपिल शर्माच्या तिखट गोड प्रश्नांना उत्तरं दिली.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

कपिल शर्माने रोहित शर्माला प्रश्न विचारला की, कधी लोकांकडून विचित्र सल्ला मिळाला आहे का? त्यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, “म्हणूनच आम्ही एअरपोर्टवरून कानात हेडफोन घालून निघतो. ते काय स्टाईल मारण्यासाठी नाही. ते सर्वकाही लोकांपासून वाचण्यासाठी असतं.” दुसरीकडे, सुनील ग्रोव्हरने रोहितला ओपनिंग बॅट्समन कसा बनवायचा याविषयी विचारले असता, त्याने “ओपनिंग बॅट्समन तो भूल जाओ” असे उत्तर दिले.या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका लिहिलं की, द ग्रेट इंडिया रोहित शर्मा शो. दुसऱ्याने लिहिलं की, हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहे.

धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.