IND vs NZ Semi Final : रोहित शर्माचा पहिल्या षटकापासून धुमधडाका, न्यूझीलंडला 2019 ची करून दिली आठवण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात 2019 च्या उपांत्य फेरीचा वचपा काढण्याची नामी संधी आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या षटकापासूनच याची झलक दाखवून दिली आहे. इंग्लंडला पहिल्या षटकापासून इंगा दाखवला होता.

IND vs NZ Semi Final : रोहित शर्माचा पहिल्या षटकापासून धुमधडाका, न्यूझीलंडला 2019 ची करून दिली आठवण
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 2:41 PM

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. कर्णधार रोहित शर्माचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे मैदानावर हा सामना होत आहे. या सामन्यापूर्वीच चार वर्षापूर्वीच्या जखमांबाबत बोललं जात होतं. पण रोहित शर्माने वारंवार तो भुतकाळ होता आणि आपल्याला पुढे जायला हवं असं सांगितलं होतं.याची झलक रोहित शर्माने पहिल्या षटकापासून दाखवून दिली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. 2019 मध्ये रोहित शर्मा अवघी 1 धावा करून तंबूत परतला होता. मग काय आता संधी मिळाली असून त्या संधीचं सोनं केलं. ट्रेंट बोल्टला पहिल्याच षटकात 10 धावा ठोकल्या.

ट्रेंट बोल्टच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर सलग दोन चौकार मारले. त्यानंतर ट्रेंट बोल्टच्या दुसऱ्या षटकात उत्तुंग षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी रोहित शर्मा पहिल्या षटकापासून आक्रमक खेळी करत आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये रोहित शर्माला वानखेडे स्टेडियम तितकं लकी नसल्याची आकडेवारी होती. ही आकडेवारीही रोहित शर्माने मोडून काढली आहे. वनडेमध्ये याच मैदानात रोहित शर्माचा सर्वाधिक स्कोअर हा 20 इतका होता. आता रोहितने हा आकडा पार केला आहे. रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. टीम सउदीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मार्क चॅपमन, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....