Video : न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चप्पल घालून रोहित शर्मा पळाला! द्रविडला मागे धावणं पडलं भाग

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया न्यूयॉर्कला पोहोचली आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने सराव सुरु केला आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 मे रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यापू्र्वी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चप्पल घालून रोहित शर्मा पळाला! द्रविडला मागे धावणं पडलं भाग
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 4:38 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. न्यूयॉर्कच्या नैसो काउंटीमधेय टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग सराव करत आहे. कर्णधार रोहित शर्मा यानेही सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. भारताला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. समोर दुबळा संघ असला तरी हलक्यात घेणं महागात पडू शकतं. त्यासाठी 5 जूनच्या सामन्यात सर्वस्वी पणाला लावलं जाणार आहे. स्पर्धेची तयारी सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओत दोघं रस्त्यावर धावताना दिसत आहे. रोहित शर्मा चप्पल घालून, तकर राहुल द्रविड टीशर्ट आणि शॉर्ट्स घालून धावताना दिसले. पण नेमकं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते

टीम इंडिया नैसो काउंटीमध्ये असून या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसत असताना राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांना कुठेतरी जायचं होतं. रोहित शर्मा पाऊस थांबण्याची वाट पाहात होता. पण पावसाचा जोर काही थांबत होता. अखेर त्यांनी गाडी मागवली आणि पावसात भिजत गाडीकडे धाव घेतली. रोहित शर्माने यावेळी चप्पल घातली होती. तर राहुल द्रविडही भिजू नये म्हणून गाडीकडे वेगाने गेला आणि बसला.

नैसो काउंटीमध्या पाऊस पडत असल्याने साखळी फेरीवर त्याचा परिणाम होऊ इतकी अपेक्षा आता क्रीडाप्रेमी करत आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाने ड्रॉप इन पिचवर जोरदार सराव केला. ड्रॉप इन पिच कृत्रिम पिच असून सरावासाठी मैदानात ठेवली जाते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमद्ये या खेळपट्टीचा वापर केला जातो. ही खेळपट्टी खासकरून फलंदाजांना मदत करते. पण स्पर्धेतील खेळपट्टी कोणाला मदत करणार हे काही सांगता येत नाही. रोहित शर्माने यासाठी संघात फिरकीपटूंना घेतलं आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.