Rohit Sharma ची टीम इंडियाचा फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती, डीसीसीआयची मोठी घोषणा

Cricket News : रोहित शर्मा याची फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

Rohit Sharma ची टीम इंडियाचा फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती, डीसीसीआयची मोठी घोषणा
physically disabled indian cricket team
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 7:34 PM

क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्माची टीम इंडियाच्या फिल्डिंग कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डीसीसीआय अर्थात भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेने याबाबतची माहिती दिली आहे. फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेला रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कर्णधार नसून दुसरी व्यक्ती आहे. दोघांमध्ये फक्त नामसाधर्म्य इतकंच साम्य आहे. दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर22 जानेवारीला महाअंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेकडे आहे.

विक्रांत रविंद्र केणी हा या चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर रविंद्र गोपीनाथ संते याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 12 जानेवारीपासून करणार आहे. टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. तर टीम इंडिया 19 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध अखेरचा सामना खेळेल.

टीम इंडिया गतविजेता

दरम्यान टीम इंडियाच या स्पर्धेतील गतविजेता आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. आता 2019 नंतर या स्पर्धेचं पुन्हा एकदा आयोजन करण्यात आलं आहे.

दिव्यांग टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 12 जानेवारी, दुपारी 2 वाजता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 13 जानेवारी, सकाळी 9 वाजता

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 15 जानेवारी, दुपारी 1 वाजता

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 16 जानेवारी, दुपारी 1 वाजता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 जानेवारी, सकाळी 9 वाजता

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 19 जानेवारी, दुपारी 1 वाजता

21 जानेवारी, महाअंतिम सामना

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र

राखीव खेळाडू : जसवंत सिंग, सादीक आणि जीएस शिवशंकरा

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.