Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहितचा धमाका, मार्टिन गुप्टीलचा रेकॉर्ड ब्रेक, विक्रमाला गवसणी
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 34 चेंडूत 64 धावांची खेळी केली. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ( became the second highest run scorer in T20 cricket) करणारा दुसरा फलंदाज ठरला.
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाचवा आणि शेवटचा टी 20 सामना (India vs England 5th T2oi) खेळवण्यात येत आहे. सलामीवीर रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) 34 चेंडूत 5 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकारांसह अफलातून 64 धावांची खेळी केली. यासह रोहितने विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला (Martin Guptil) पछाडलं आहे. यासह रोहितने विक्रमी कामगिरी केली आहे. (Rohit Sharma became the second highest run scorer in T20 cricket)
An incredible knock from Hitman Rohit Sharma (64) comes to an end. He has provided a terrific platform for #TeamIndia. ??https://t.co/esxKh1iZRh #INDvENG @Paytm pic.twitter.com/LV3jbOVapn
— BCCI (@BCCI) March 20, 2021
काय आहे विक्रम?
रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या सामन्याआधी या दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील होता. गुप्टीलला पछाडण्यासाठी रोहितला 40 धावांची आवश्यकता होती. रोहितच्या नावे 2 हजार 800 धावा होत्या. पण रोहितने 40 धावा पूर्ण करताच गुप्टीलला पछाडलं. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. ताज्या आकडेवारीनुसार रोहितच्या नावे 111 सामन्यात 2 हजार 864 धावांची नोदं आहे. तर मार्टिन गुप्टीलच्या नावावर 2 हजार 839 धावा आहेत.
पहिल्या क्रमांकावर विराट
सर्वाधिक धावांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर 3 हजार पेक्षा अधिक धावांची नोंद आहे.
94 धावांची सलामी भागीदारी
दरम्यान टीम इंडियाने या पाचव्या सामन्यात शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 94 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. तसेच रोहित शर्माने आपले अर्धशतकही पूर्ण केलं.
इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे तगडे आव्हान
टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 224 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. तसेच हिटमॅन रोहित शर्माने 34 चेंडूत 5 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकारांसह अफलातून 64 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 39 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवने 32 रन्सची खेळी केली.
संबंधित बातम्या :
(Rohit Sharma became the second highest run scorer in T20 cricket)