Rohit Sharma : इंडियन्सला मोठा झटका, रोहित शर्माला 24 लाखांचा दंड, काय आहे दंडाचं कारण?

आधीच आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला सलग पाचवेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे एकीकडे संघ प्रत्येक सामन्यावेळी जिंकण्याची आशा करताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ही बातमीने कर्णधार रोहित शर्मा यांच्यासंदर्भातली आहे.

Rohit Sharma : इंडियन्सला मोठा झटका, रोहित शर्माला 24 लाखांचा दंड, काय आहे दंडाचं कारण?
रोहित शर्मा, कर्णधार, मुंबई इंडियन्सImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 1:51 PM

मुंबई : आधीच आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग पाचवेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे एकीकडे संघ प्रत्येक सामन्यावेळी जिंकण्याची आशा करताना दिसत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे ही बातमीने कर्णधार रोहित शर्मा याच्यासंदर्भातली आहे. रोहित शर्माला (Cricketer Rohit Sharma) 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित शर्माला हा दंड स्लो ओवर रेटसाठी लावण्यात आला आहे. हा दंड लागला असला तरी रोहितला त्यासंदर्भात इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं नेण्याची प्लॅनिंग करणाऱ्या रोहितला आता आणखी एका संंकटाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागेल्या मुंबई इंडियन्सला आणि त्यांच्या संघाच्या कर्णधाराचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय.

रोहित शर्माला इशारा

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाबचा सामना झाला. या सामन्यात सलग पाचव्यावेळेस मुंबईला पराभवाचा सामना करावा लगला. यावेळी फक्त बारा धावांनी पंजाबचा विजय झाला. तर दुसरीकडे मुंबईच्या पारड्यात पुन्हा एकदा अपयश पडलं आहे. रोहितने काल झालेल्या सामन्यात 17 बॉलवर 28 धावा काढल्या. त्यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मात्र, हे असलं तरी स्लो रन रेटचं कारण देत रोहितला चोवीस लाखांचा भुर्दंड बसला आहे. त्यानंतर रोहित शर्माला इशारा देखील देण्यात आला आहे की, पुढील सामन्यात हीच परिस्थिती असल्यास एक सामन्यासाठी तुमच्यावर बंध आणू म्हणून. त्यामुळे रोहित शर्माच्या अडचणी आधीच वाढलेल्या असताना पुन्हा एकदा त्याच्यासमोर चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

विजयसाठी प्रयत्न आवश्यक

मुंबई इंडियन्स  पाच सामने खेळून देखील एकाही सामन्यात विजयी होऊ शकलेला नाही. या मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील खालच्या दिशेला चाललेल्या प्रवासाकडे अनेक क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करतायेत. यावरुन संघातील काही खेळाडूंच्या सुमार कामगिरीवरही बोललं जातंय. या संघाने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलंय. मात्र, अशातच 2015 चा फॉर्म्यूला जर रोहित शर्माने वापरला तर पुन्हा मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचू शकतो. तो फॉर्म्यूला नेमका काय आहे?, 2015 मध्ये भारताने म्हणजेच रोहित शर्माने असा कोणता फॉर्म्यूला वापरला होता की त्यात इंडियन्सला मोठं यश मिळालं? हाच फॉर्म्यूला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा फॉर्म्यूला वापरून मुंबई इंडियन्स सहज जेतेपद मिळवू शकतो.

इतर बातम्या

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर

Video : हात नसताना तरूण बनवतोय नूडल्स, नेटकरी म्हणतात, “बेस्ट कुक इन द वर्ल्ड!”

Pune fire : पुणे स्टेशनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आग, स्टॉल्स जळून खाक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.