Rohit Sharma : आता विषय संपला, रोहित शर्मा स्वत: म्हणाला, ‘हा’ रेकॉर्ड मोडणारच!

Rohit Sharma Records : रोहित शर्माने एक विक्रम मोडणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. स्वत: हिट-मॅनने हा पराक्रम मोडणार म्हटल्यामुळे चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. मात्र तो रेकॉर्ड नेमका आहे तरी कोणता जाणून घ्या.

Rohit Sharma : आता विषय संपला, रोहित शर्मा स्वत: म्हणाला, 'हा' रेकॉर्ड मोडणारच!
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 1:12 PM

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये परत एकदा भारत-पाक आमने-सामने येणार असून हा हायव्होल्टेज सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. मागील सामन्यामधील चुका टाळत टीम इंडिया पाकिस्तानसोबत दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम मोडणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. स्वत: हिट-मॅनने हा पराक्रम मोडणार म्हटल्यामुळे चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. मात्र तो रेकॉर्ड नेमका आहे तरी कोणता जाणून घ्या.

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्मा याची मुलाखत व्हायरल होत आहे. त्यामध्ये रोहितला या विक्रमाबाबत विचारण्यात आलं. युनिवर्स बॉस ख्रिस गेल याच्या नावावरचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडण्यापासून रोहित काहीच पाऊल दूर आहे. हा विक्रम तुला मोडायचा की नाही? यावर बोलताना रोहित आधी हसला आणि म्हणाला की, जर असं झालं जर हा एक युनिक रेकॉर्ड असेल. तसं पाहायला गेलं तर मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की गेलचा विक्रम मोडेल त्यानंतर रोहित त्याच्या बायसेप्सकडे पाहून हसायला लागला.

रोहितला हिटमॅन नावाबाबत विचारलं, त्यावर तो म्हणाला की हे लोकांना विचारायला हवं. मी काही मसलवाला खेळाडू नाही पण मला बॉल जोरात मारायला आवडतो. लहानपणी बॉल हवेत मारायचा नाही असं शिकवलं होतं. जो कोण मोठे शॉट्स खेळेल त्याला नेटमधून बाहेर काढलं जायचं.

दरम्यान, रोहित शर्मा याने आतापर्यंत 446 सामन्यांमध्ये त्याने 539 सामने सिक्सर मारले आहेत. ख्रिस गेल याने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गेलच्या नावावर एकूण 553 षटकार मारलेत. अवघे 14 सिक्सर त्याला मारायचे आहेत. तर दुसरीकडे रोहित शर्माने टी-20 मध्ये सर्वाधिक 182 षटकार तर दुसऱ्या स्थानी मार्टिन गुप्टिल असून त्याने 173 षटकार मारले आहेत. आशिया कपमध्येच रोहि हा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.