रोहित शर्मा कर्णधार, हार्दिक उपकर्णधार, आयपीएल दरम्यान बीसीसीआयची घोषणा

Rohit Sharma Captain : रोहित शर्माचा आज 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. बीसीसीआयने रोहितच्या वाढदिवशी मोठी घोषणा केली आहे.

रोहित शर्मा कर्णधार, हार्दिक उपकर्णधार, आयपीएल दरम्यान बीसीसीआयची घोषणा
mi hardik pandya,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 6:25 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज 30 एप्रिल रोजी 48 वा सामना होणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप टी 20 2024 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार मुख्य संघात 15 आणि राखीव म्हणून 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने अशाप्रकारे 19 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. हार्दिक पंड्या हा उपकर्णधार असणार आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाची सूत्रं सांभाळणार आहे. रोहित शर्माला टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन्सी करणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली होती. मात्र रोहितच्या वाढदिवशीच टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठी घोषणा करुन रोहितला कॅप्टन्सी देण्यात आली. त्यामुळे बीसीसीआयने रोहितला बर्थडे गिफ्ट दिल्याचंही म्हटलं जात आहे.

आयपीएलमध्ये सध्या हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतोय. रोहित हार्दिकच्या कॅप्टन्सीत खेळतोय. मात्र काही दिवसांनी चित्र उलट असणार आहे. हार्दिक पंड्या रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे. रोहितच्या चाहत्यांना ही बातमी निश्चितच सुखावणारी आहे.

दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 मधील पराभवानंतर या शॉर्ट फॉर्मेटपासून दूर होते. तेव्हा हार्दिक पंड्या टीम इंडियाचं टी 20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करत होता. मात्र आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कमबॅक केलं आणि तयारीला लागले.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.