Video : दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा पंचाशी जे काही बोलला त्यावर आता दिलं स्पष्टीकरण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्मा निराशेच्या गर्तेत अडकला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिका विरुद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन केलं. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून अफगाणिस्तानविरुद्ध टी20 सामन्यातून पुनरागमन केलं. पण पहिल्या दोन सामन्यात खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पंचांसोबत एक चर्चा झाली होती. त्या चर्चेवर रोहित शर्माने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

Video : दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा पंचाशी जे काही बोलला त्यावर आता दिलं स्पष्टीकरण
Video : पंचांसोबतचा संवाद माईकमध्ये झाला होता रेकॉर्ड, आता रोहित शर्माने 'त्या' शून्य खेळीबाबत काय ते सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 8:24 PM

मुंबई : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा असणार आहे. जवळपास दीड वर्षानंतर रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत टी20 खेळला. इतकंच काय तर या मालिकेत कर्णधारपदही भूषवलं होतं. टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा या फॉरमॅटपासून दूर होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. त्यामुळे रोहित शर्मावर दडपण स्पष्ट दिसत होतं. कारण कर्णधारपदाची जबाबदारी असताना शून्यावर बाद होणं क्रीडाप्रेमींना रुचणारं नव्हतं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काहीही करून धावा करायच्या होत्या. रोहित शर्माने या सामन्यात 69 चेंडूत 121 धावंची खेळी केली होती. पण सुरुवातीला रोहित शर्मा धावांसाठी धडपड करताना दिसला होता. इतकंच काय तर पहिल्यांदा चौकार आल्यानंतर खूश झाला होता. पण पंचांना लेग बाय देत चौकार दिला. त्यामुळे रोहित शर्मा नाराज दिसला आणि थेट पंचांशी संवाद साधला होता. त्यांचं बोलणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं होतं.

विरेंदर शर्मा हे या सामन्यात पंच होते. तेव्हा रोहित शर्माने पंचांना विचारलं की, ‘अरे विरू, थाय-पॅड दिला का पहिला चौकार? बॅट लागली होती.’, असं रोहित शर्माने पंचांना विचारलं होतं. आता कुठे त्या संभाषणावर कर्णधार रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे. पाचव्या कसोटी सामन्यासाठी धर्मशाळेत पोहोचलेल्या रोहित शर्माने याबाबत आता खुलासा केला आहे.

“जेव्हा तुम्ही सलग दोनदा शून्यावर बाद होता. तेव्हा एका धावेचं महत्त्व असतं. मी बॅटने चौकार मारला होता पण पंचांनी ते नीट पाहिलं नाही लेग बाय दिला. खरं तर मी फलंदाजी करताना स्कोअरबोर्डकडे पाहात नाही. माझं सगळं लक्ष फलंदाजीकडे असतं. पण जे व्हा ओव्हर संपली. तेव्हा माझं लक्ष वर गेलं तेव्हा स्कोअरबोर्डवर रोहित शर्मा 0 असं होतं. मला वाटलं की माझ्या खात्यात चौकार असेल. पण तिथे शून्य होतं. तेव्हा मी विचारलं की विरू आधी थायपॅड दिलं का?”, असा खुलासा रोहित शर्मा याने केला.

मैदानावरील इतर संभाषणाबाबतही रोहित शर्माला विचारलं असता म्हणाला की, ‘मी असं काही ठरवून बोलत नाही. तसेच मुद्दामही करत नाही. कर्णधार असल्याने मी स्लिपमध्ये उभा राहतो. कारण तेथून मला क्षेत्ररक्षण व्यवस्थितरित्या पाहता येते. तसेच डीआरएसचा आढावा घेता येतो. तेव्हा मी क्षेत्ररक्षकांशी बोलतो आणि ते सर्व रेकॉर्ड होतं.’

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....