Sarfaraz Khan ची चूक, Rohit Sharma संतापला आणि बुक्का मारला, पाहा व्हीडिओ
Rohit Sharma Punched Sarfaraz Khan : सर्फराज खान याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे कर्णधार रोहित शर्मा संतापला. रोहितने सर्फराजच्या पाठीत बुक्का मारला. त्यानंतर काय झालं? पाहा व्हीडिओ.
टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून एडलेड येथे होणार आहे. त्याआधी आज 1 डिसेंबरला कॅनबेरा येथे टीम इंडिया विरुद्ध प्राईम मिनिस्टर इलेव्हनसह सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर सर्फराज खान याच्याकडून छोटी चूक झाली. त्यामुळे कॅप्टन रोहितने सर्फराजच्या पाठीत बुक्का मारला. रोहितने सर्फराजला बुक्का मारल्याचा व्हीडिओ सोशल मीडियाव व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
हर्षित राणा सामन्यातील 23 वी ओव्हर टाकायला आला. हर्षितने या ओव्हरमधील टाकलेला पाचवा बॉल विकेटकीपर सर्फराज खान अचूक पकडू शकला नाही. त्यामुळे बॉल खाली पडला. तेवढ्यात रोहित सर्फराजच्या जवळ गेला. सर्फराज बॉल उचलतोय तितक्यात रोहितने सर्फराजला मस्करीत पाठीत बुक्का मारला. त्यानंतर सर्फराजही हसू लागला. या सर्व गंमतशीर प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हर्षित राणाकडून 6 बॉलमध्ये 4 विकेट्स
दरम्यान हर्षित राणा याने 6 बॉलमध्ये 4 विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हनला बॅकफुटवर टाकलं. हर्षितने घेतलेल्या या 4 विकेट्समुळे ऑस्ट्रेलिया पीएम ईलेव्हनची स्थिती 131-2 वरुन 133-6 अशी झाली.
रोहितने सर्फराजला मस्तीत बुक्का मारला
Rohit 🤣 pic.twitter.com/ivusxzLlhh
— Abhi (@CoverDrive001) December 1, 2024
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर प्लेइंग ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.