मोठी बातमी! रोहित शर्मा टीम इंडियासाठी या दिवशी खेळणार शेवटचा सामना?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची तयारी सुरु आहे. पण अजूनही संघाची घोषणा केलेली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार यात काही शंका नाही. असं असताना त्याच्या निवृत्तीबाबत आणखी एका दावा करणारी बातमी समोर आली आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी शेवटचा सामना याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर रोहित शर्माचं नशिब फुटकं निघाल्याचं दिसत आहे. फलंदाजीतही रोहित शर्मा वारंवार फेल जात असल्याने निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. त्यात रोहित शर्मा आणखी किती काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार? असा प्रश्नही विचारला जात आहे. असं असताना या प्रश्नाचं उत्तर मिळताना दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम लागेल असं बोललं जात आहे. 11 जानेवारील बीसीसीआय, निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माने भाग घेतला होता. यात दुसरा कर्णधार मिळत नाही तोपर्यंत कर्णधार असेल असं सांगण्यात येत आहे. पण एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्माच्या कारकिर्दीचा शेवट असणार आहे.
दैनिक जागरणच्या बातमीनुसार, रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच रोहित शर्माला बाजूला केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. 2 मार्चला या साखळी फेरीचा शेवटचा सामना होणार आहे. जर टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली तर 4 मार्च आणि अंतिम फेरी गाठली तर 9 मार्च रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवट असू शकतो. दरम्यान, रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून वर्ल्डकप विजयानंतरच निवृत्ती जाहीर केली आहे.
रोहित शर्मा बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत पूर्णपणे फेल गेला होता. इतकंच काय खराब फॉर्ममुळे रोहित शर्माने सिडनी कसोटीत स्वताला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं होतं. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटीसाठी त्याचा विचार होणं कठीण आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यात टीम इंडिया अपयशी ठरली. त्यामुळे रोहित शर्माला संधी मिळणं कठीण आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. तेव्हा रोहित शर्मा 40 वर्षांचा होईल. अशात त्याचं वनडे वर्ल्डकप खेळणं कठीण आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच त्याचा क्रिकेट कारकिर्दिचा शेवट असण्याची शक्यता आहे.