बंगळुरु | रोहित शर्मा, टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज. रोहित शर्माने 14 महिन्यांनी अफगाणिस्तान टी 20 मध्ये कमबॅक केलं. रोहितला पहिल्या 2 सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध 1 धावही कतरता आली नाही. मात्र तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात रोहितने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना झोडपून काढला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड केला. रोहितने नाबाद 121 धावांची विस्फोटक खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 212 धावा केल्या.
रोहितने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या 4 विकेट्स 22 धावांवर गेल्या. मात्र रोहितने एक बाजू लावून धरली. रोहितने 69 बॉलमध्ये 11 चौकार आणि 8 सिक्ससह नाबाद 121 धावांची खेळी केली. रोहितने रिंकूसह पाचव्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची भागीदारी केली. रिंकूही 69 रन्सवर नॉट आऊट राहिला. रिंकू 39 बॉलमध्ये 2 चौकार आणि 6 सिक्ससह नाबाद परतला. टीम इंडियाने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 4 बाद 212 धावा केल्या.
रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. रोहितने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला. रोहितने या शतकासह टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव आणि ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला. मॅक्सवेल आणि सूर्यकुमार या दोघांच्या नावावर टी 20 मध्ये प्रत्येकी 4-4 शतकं आहेत.
दरम्यान टीम इंडियात या तिसऱ्या सामन्यासाठी 3 बदल करण्यात आले. त्यानुसार अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंह या तिघांना बाहेर ठेवण्यात आलं. तर त्या जागी कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि आवेश खान या तिघांना संधी देण्यात आली आहे.
रोहितचा अफगाणिस्तान विरुद्ध दणका
📸 📸
That Was One Ro-Special 💯!
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/n42Wcei0B2
— BCCI (@BCCI) January 17, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.