IND Vs ENG | धर्मशालेत इंडिया-इंग्लंडची कसोटी, पाचव्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
India Playing 11 Against England | इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कॅप्टन रोहित टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकतो.
धर्मशाला | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा धर्मशालेत खेळवण्यात येणार आहे. हा सामना हा 7 ते 11 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ धर्मशालेत दाखल झाले आहेत. टीम इंडिया पाचवा सामना जिंकून विजयी चौकार ठोकण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड विजयाने भारत दौऱ्याची सांगता करण्याचा प्रयत्न असणार आहे. पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियात काही बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं आहे. बुमराहला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. तर वॉशिंग्टन सुंदर याला रणजी ट्रॉफी सेमी फायनलसाठी रिलीज करण्यात आलं. त्यामुळे प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी आकाश दीप याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. आकाश दीप याने चौथ्या कसोटीतून पदार्पण केलं होतं. आकाशने पदार्पणातच आपली छाप सोडली होती. आकाशने पहिल्या डावात इंग्लंडला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर ढकलत टीम इंडियाला अफलातून सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आकाश दीपवर पुन्हा एकदा विश्वास टाकू शकते.
देवदत्तचं डेब्यू?
टीम इंडियासाठी टी 20 क्रिकेट खेळलेल्या देवदत्त पडीक्कल याला टेस्ट डेब्यू करण्याची संधी मिळू शकते. देवदत्तला रजत पाटीदार याच्या जागी संधी मिळू शकते. रजत पाटीदार याने दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं. त्यानंतर तो सलग 3 सामने खेळला. मात्र त्याने निराशा केली. त्यामुळे रजतला बाहेरचा रस्ता दाखवून त्याच्या जागी देवदत्तला संधी मिळू शकते.
बुमराहला कुणाच्या जागी संधी?
आता बुमराहचं पाचव्या सामन्यासाठी कमबॅक झाल्यानं त्याच्यासाठी कोण बाहेर बसणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अशात मोहम्मद सिराज याला विश्रांती दिली जाऊ शकते. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार सिराजला पुन्हा विश्रांती मिळू शकते. सिराजला विशाखापट्टणम कसोटीतूनही विश्रांती दिली होती.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, जसप्रीत बुमराह (उपकप्तान) मोहम्मद सिराज
टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.