IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार कॅप्टन्सी, हार्दिक पंड्या होणार नवा कर्णधार?

Mumbai Captain Hardik Pandya : आयपीएलमध्ये हार्दिक पंंड्या परत एकदा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. आता हार्दिकच्या येण्याने गुजरात संघाने शुबमन गिलला कर्णधारपद दिलं आहे. मात्र आता मुंबईच्या कर्णधारपदी हार्दिकची वर्णी लागते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार कॅप्टन्सी, हार्दिक पंड्या होणार नवा कर्णधार?
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 5:31 PM

मुंबई : आयपीएल 2024 आधी मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून तो म्हणजे हार्दिक पंड्या मुंबईत आला आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांना बसला आहे कारण पंड्याकडे कर्णधारपद असताना त्याने मुंबईत परतण्याचा निर्णय कसाकाय घेतला. पंड्याला संघात घेण्यासाठी मुंबईने 15 कोटी रूपये मोजलेत. यासाठी मुंबईने ग्रीनला आरसीबी संघाला देत हार्दिकसाठी पैसे जमा केले, ग्रीनला देत मुंबईने हार्दिकला संघात घेतलंच त्यासोबतच पर्समध्ये 2.25 कोटी आल्याने मुंबईकडे लिलावासाठी आता टोटल 17.50 कोटी झाले आहेत. हार्दिकच्या येण्याने क्रीडा वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

हार्दिक पंड्याला कोटीरूपये खर्च करत संघात घेण्यामागे मुंबईचा मास्टरप्लॅन असावा. हार्दिकही फक्त कर्णधारपद सोडून मुंबईमध्ये आला नसावा. रोहित शर्मा आता मुंबईचा कर्णधार आहे, यंदाच्या मोसमामध्ये रोहितने कर्णधारपदाची भूमिका बजावली तरी त्यानंतर संघात कर्णधार म्हणून हार्दिक एक चांगला पर्याय असणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ती जागा हार्दिकची आहे यात काही शंका नाही.

हार्दिक पंड्याने मुंबईतून गुजरातमध्ये गेल्यावर संघाच्या कर्णधारपदाची भूमिका बजावली होती. इतकंच नाहीतर पहिल्याच वर्षी हार्दिकने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर दुसऱ्या पर्वातही फायनल गाठलेली मात्र फायनलमध्ये सीएसकेने त्यांना पराभूत केलं होतं. कर्णधारपदाचा अनुभवही हार्दिककडे चांगला आला असून भारतीय संघाच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी त्याने पार पाडली आहे. हार्दिकला इतके पैसे लावून मुंबईने फक्त यंदाच्या पर्वाचा नाहीतर भविष्याचा विचार करून संघात घेतलं असावं.

दरम्यान, हार्दिकला घेण्यासाठी मुंबईने कॅमेरून ग्रीन याला आरसीबीला दिलं. आता असा प्रश्न निर्माण होतो की हार्दिकसाठी मुंबईने ग्रीनचा बळी तर नाही ना दिला असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत. आरसीबीला देण्याआधी मुंबईने सीएसके आणि हैदराबाद  या दोन संघांना विचारल्याची माहिती समजत आहे. आता आरसीबीच्या ताफ्यात ऑल राऊँडर गेला असला तरी त्यांना यंदाच्या लिलावामध्ये संघासाठी एक चांगला बॉलिंग लाईनअप घ्यावा लागणार आहे. रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये जोश हेजलवूड, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.