AUS vs IND : कॅप्टन रोहित टीमसाठी दुसऱ्या कसोटीत मनाचा मोठेपणा दाखवणार?
Rohit Sharma Australia vs India 2nd test : रोहित शर्मा ऑस्ट्रेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहितच्या त्या एका भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
टीम इंडियाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरुद्ध झालेल्या 50 षटकांच्या सामन्यात शानदार विजय मिळवला. टीम इंडियाचा या विजयामुळे विश्वास दुणावला आहे. दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. हा सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे होणार आहे. दुसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा कोणत्या स्थानी बॅटिंगसाठी येतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
रोहित त्याग करणार का?
रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत केएल राहुल याने यशस्वी जयस्वाल याच्यासह ओपनिंग केली. या जोडीने दुसऱ्या डावात 201 धावांची सलामी आणि विक्रमी भागीदारी केली. भारताच्या विजयात या जोडीने निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर पीएम ईलेव्हन सामन्यातही रोहित टीममध्ये असूनही यशस्वी आणि केएल या दोघांनी ओपनिंग केली. रोहितने तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्या जागी केएलला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रोहित दुसर्या कसोटीत टीम इंडियाच्या फायद्यासाठी स्वत: न येता यशस्वीच्या जोडीला केएलला ओपनिंग करु देत मनाचा मोठेपणा दाखवणार का? याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.
तसेच रोहितने केएलसाठी मनाचा मोठेपणा दाखवला, तर कॅप्टन कोणत्या स्थानी बॅटिंगसाठी येणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. आपण या निमित्ताने रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या स्थानी खेळताना किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
रोहितची कोणत्या स्थानी सर्वोत्तम कामगिरी
रोहितने आतापर्यंत कसोटीत सर्वाधिक वेळा ओपनिंग केली आहे. रोहितने 66 डावांमध्ये सलामीला येत 44 च्या सरासरीने 9 शतकांसह 2 हजार 685 धावा केल्या आहेत.
रोहितने तिसऱ्या स्थानी 4 सामन्यांमधील 5 डावांमध्ये 21.40 च्या सरासरीने 1 अर्धशतकासह 107 धावा केल्या आहेत. हिटमॅन चौथ्या स्थानी फक्त एकदाच खेळलाय. रोहितने चौथ्या स्थानी खेळताना एकमेव डावात 4 धावा केल्या आहेत.
रोहितने 9 सामन्यांमध्ये 16 डावात पाचव्या स्थानी बॅटिंगला येत 29.13 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 437 धावा केल्या आहेत.
सहाव्या स्थानी उत्तम कामगिरी
रोहितची सहाव्या स्थानी उत्तम कामगिरी राहिली आहे. रोहितने सहाव्या स्थानी 16 सामन्यांमधील 25 डावांमध्ये 54.57 च्या स्ट्राईक रेटने 3 शतकं आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 37 धावा केल्या.