IPL 2024 : आयपीएल संघातून रोहित शर्माला बाहेरचा रस्ता, हार्दिक-बुमराह आणि सूर्या यांच्यावर दाखवला विश्वास
आयपीएल स्पर्धेत सर्वात्तम कर्णधार म्हणून आतापर्यंत रोहित शर्माचं नाव गणलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण मुंबई फ्रेंचायसीने यंदा त्याच्या ऐवजी हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला आहे. आता रोहितच्या पदारी आणखी एक अपयश पडलं आहे. त्याला आयपीएल संघातून वगळण्यात आलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा एका मागोमाग एक संकटाला सामोरं जात आहे. काही गोष्टी चांगल्या घडल्या, तर काही क्रीडाप्रेमींना रुचल्या नाहीत. मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला संघात सहभागी करून घेतलं. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवलं. त्यामुळे रोहित शर्मा नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 22 मार्चपासून आयपीएल पर्व सुरु होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे ट्रेड विंडोच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण हे सर्व घडत असताना रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आयपीएल संघात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली आहे. पण रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे. प्लेइंग 11 सोडा 16 सदस्यांच्या सूचीतही नाव नाही.
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत आयपीएलचे 16 पर्व झाले आहेत. तसेच 17 व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु आहे. या दरम्यान आतापर्यंत सर्वोत्तम आयपीएल संघाची निवड करण्यात आली. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे आयपीएल संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या रोहित शर्माला संधी मिळाली नाही. विराट कोहली, मिस्टर आयपीएल सुरेश रैना यांना संघात संधी मिळाली आहे. या व्यतिरिक्त ख्रिस गेल, डेविड वॉर्नर, सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्स संघात स्थान मिळालं आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, किरोन पोलार्ड यांना संधी मिळाली आहे. फिरकीपटू म्हणून राशीद खान, सुनील नरेन आणि युजवेंद्र चहल यांची निवड झाली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहला स्थान मिळालं आहे.
दिग्गजांनी निवडलेला सर्वकालीन आवडता आयपीएल संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, किरॉन पोलार्ड, रशीद खान, सुनील नरेन, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.