IND vs PAK : रोहित शर्मा याला आशिया कपच्या पहिल्या सामन्यात फसवलं, दुसऱ्या सामन्यात वचपा काढत धु धु धुतलं

IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. तसेच पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

IND vs PAK : रोहित शर्मा याला आशिया कपच्या पहिल्या सामन्यात फसवलं, दुसऱ्या सामन्यात वचपा काढत धु धु धुतलं
IND vs PAK : रोहित शर्मा याचा पारा चढला, अर्धशतकांचं अर्धशतक करत पाकिस्तानी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 4:28 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पाकिस्तानचा गोलंदाजी अटॅक पाहता भारतावर हावी होतील, असा अंदाज क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी हा अंदाज फोल ठरवला आहे. पहिल्या गड्यासाठी दोघांनी शतकी भागीदारी केली. तसेच वैयक्तिक अर्धशतकंही झळकावली. सुरुवातीला सावध फलंदाजी करणाऱ्या या जोडीने नंतर आक्रमक पवित्रा दाखवला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजी पुरते हतबल दिसून आले. रोहित शर्मा याने आपल्या वनडे कारकिर्दीतलं 50 वं अर्धशतक झळकावलं . रोहित शर्मा याने 42 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

रोहित शर्मा याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने झटपट अर्धशतक झळकावलं. सुरुवातीला अडखळत खेळत होता. मात्र त्यानंतर आपला आक्रमक पवित्रा दाखवत थेट गोलंदाजांवर दबाव आणला. पण शादाब खानच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटा मारण्याच्या नादात झेल बाद झाला. फहीम अश्रफने त्याचा झेल घेतला. दुसरीकडे रोहित शर्मा याने अर्धशतकांचं अर्धशतकही पूर्ण केलं आहे. वनडे कारकिर्दित त्याच्या नावावर 50 अर्धशतकांची नोंद झाली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.