IND vs ENG | कॅप्टन रोहित शर्माचा अर्धशतकी धमाका, टीम इंडिया मालिका विजयाच्या जवळ

Rohit Sharma Fifty | रोहितने कसोटी कारकीर्दीतील 17 वं अर्धशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत टीम इंडियाला मालिका विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं आहे.

IND vs ENG | कॅप्टन रोहित शर्माचा अर्धशतकी धमाका, टीम इंडिया मालिका विजयाच्या जवळ
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:47 AM

रांची | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर 2 धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या या अर्धशतकी खेळीत 5 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. रोहितने अर्धशतकासाठी 69 चेंडूंचा सामना केला. रोहितचा स्ट्राईक रेट या दरम्यान 72.46 इतका होता. तसेच रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे 17 वं अर्धशतक ठरलं.

टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं आव्हान

इंग्लंडने टीम इंडियाला चौथ्या कसोटी सामन्यात विजयासाठी तिसऱ्या दिवशी 192 धावांचं आव्हान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा याने यशस्वी जयस्वाल याच्यासह तिसऱ्या दिवसापर्यंत बिनबाद 40 केल्या. त्यानंतर या सलामी जोडीने चौथ्या दिवसाची सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर या दोघांनी मिळतील तशा धावा करत गेले. मात्र इंग्लंडने भारताला पहिला झटक देत विकेट्सच खातं उघडलं.

जो रुट याने टीम इंडियाला पहिला धक्का दिला. रुटने टीम इंडियाच्या डावातील 18 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर यशस्वी जयस्वाल याचा काटा काढला. जेम्स एंडरसन याने वयाच्या 41 व्या वर्षी 20 वर्षांच्या तरुणांना लाजवेल असा अप्रतिम कॅच घेतला. यशस्वीने जो रुटच्या बॉलिंगवर फटका मारला. यशस्वीने मारलेला फटका जेम्स एंडरसनच्या दिशेने गेला. एंडरसनने उडी घेत सुंदर असा कॅच घेतला. त्यामुळे यशस्वीला माघारी जावं लागंल. यशस्वी 37 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची सलामी जोडी 84 धावांवर फुटली.

रोहित शर्मा याची कॅप्टन्सी इनिंग

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.