Rohit Sharma जगातला नंबर 1 सिक्सर किंग, ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त
Rohit Sharma most sixes World Record | रोहत शर्मा याने विराट कोहली याच्या होमग्राउंड अरुण जेटली स्टेडियममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. रोहित आता क्रिकेट विश्वातला नवा सिक्सर किंग ठरला आहे.
नवी दिल्ली | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. रोहित शर्मा याने 273 धावांचा पाठलाग करताना वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. रोहित शर्मा नवा सिक्सर किंग ठरला आहे. रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विश्व विक्रम केला आहे. रोहितने याबाबतीच वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
रोहित शर्मा याला अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ख्रिस गेल याला पछाडण्यासाठी 3 सिक्सची गरज होती. या सामन्याआधी रोहितच्या नावावर 551 सिक्सची नोंद होती. तर ख्रिस गेल याच्या नावावर 553 सिक्स आहेत. त्यामुळे रोहितला वर्ल्ड रेकॉर्डसाठी 3 सिक्सची गरज होती. रोहितने टीम इंडियाच्या डावातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारे फलंदाज आठव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स ठोकत विश्व विक्रम केला. रोहितने हा ऐतिहासिक सिक्स नवीन उल हक याच्या बॉलिंगवर ठोकला.
रोहित शर्मा नवा सिक्सर किंग
रोहित शर्मा : 554 सिक्स*.
ख्रिस गेल : 553 सिक्स.
शाहिद आफ्रिदी : 476 सिक्स.
ब्रँडन मॅक्युलम : 398 सिक्स.
मार्टिन गुप्टील : 383 सिक्स.
30 बॉलमध्ये अर्धशतक
दरम्यान टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने अफगाणिस्तान विरुद्ध यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या वनडे कारकीर्दीतील हे 53 वं अर्धशतक ठरलं. रोहितने 30 बॉलमध्ये 7 रंपाट चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचा या दरम्यान 176. 67 च्या सुपरडुपर स्ट्राईक रेटने होता. रोहितने अर्धशतकी खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी केली.
रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड
ICC special poster for Rohit Sharma.
– The GOAT six hitter. pic.twitter.com/kGPfwVEliF
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.