IND vs ENG | टीम इंडियाला मोठा झटका, यशस्वी जयस्वालसोबत काय झालं? रोहितही नाराज
India vs England 4th Test | कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर रोहित यशस्वीवर नाराज दिसला. नक्की काय झालं?
रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवशी कॅप्टन रोहित शर्मा याने भर मैदानात जाहीर नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 40 धावा केल्या. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांनी चौथ्या दिवसाची आश्वासक सुरुवात केली. मात्र जो रुटच्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल कॅच आऊट झाला आणि टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. त्यामुळे रोहितने जाहीर नाराजी व्यक्त करत यशस्वीला बडबडला.
नक्की काय झालं?
रोहित-यशस्वी या दोघांनी चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी केली. दोघेही एकेरी-दुहेरी धावा घेत चांगला खेळ करत होते. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड विकेटच्या शोधात होती. कॅप्टन बेन स्टोक्स याने टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 18 वी ओव्हरमध्ये जो रुट याला बॉलिंगला आणलं. जो रुटने स्टोक्सचा विश्वास सार्थ ठरवला. तसेच जेम्स एंडरसन याला चांगली साथ दिली.
यशस्वी जयस्वाल याने जो रुटच्या या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. यशस्वीने मारलेला फटका विकेटकीपरच्या डाव्या बाजूला गेला. जेम्स अँडरसन याने चलाखीने बॉल पाहून हवेत झेप घेतली आणि अप्रतिम कॅच घेतला. जेम्सने घेतलेल्या कॅचमुळे टीम इंडियाची ओपनिंग जोडी ब्रेक झाली आणि यशस्वीला माघारी जावं लागंल.
रोहित-यशस्वी या दोघांनी 84 धावांची सलामी भागीदारी केली. तर यशस्वी जयस्वाल याने 44 बॉलमध्ये 84.09 च्या स्ट्राईक रेटने 37 धावा केल्या. आता यशस्वी बाद झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. तर इंग्लंडचा झटपट आणखी 1-2 विकेट्स घेत टीम इंडियाला बॅक फुटवर ढकलण्याचा प्रयत्न असेल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.