IND vs NED | Rohit Sharma Wicket : सिक्सर मशीन हिटमॅनला सिक्स, पुढच्या बॉलवर विकेट, पाहा नेमकं काय झालं?

Rohit Sharma Wicket against Nederlands : रोहितने या वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. रोहितने बॉलिंग घेतल्यावर त्याला सिक्स बसल्यावर पाहा त्याने काय केलं आणि पठ्ठ्याने विकेट घेतली.

IND vs NED | Rohit Sharma Wicket : सिक्सर मशीन हिटमॅनला सिक्स, पुढच्या बॉलवर विकेट, पाहा नेमकं काय झालं?
Rohit Sharma Wicket against Nederland in world cup
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 11:11 AM

मुंबई : भारत आणि नेदरलँड्समधील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने तब्बल 160 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 250 धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून रविवारी झालेल्या सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी बॉलिंग केली. कप्तान रोहित शर्माने एक ओव्हर टाकली, यामध्ये त्याने विकेटही घेतली. रोहितच नाहीतर विराटनेही विकेट घेत सर्वांचं मनोरंजन केलं. रोहित शर्माला आधीच्या बॉलवर सिक्स बसला होता त्यानंतर गड्याने दमदार कमबॅक केलं.

रोहित शर्मा याने नेदरलँड्सच्या तेजा निदामनुरुला आऊट करत ऑल आऊट केलं. रोहितने 48 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग घेतली होती. रोहितला या ओव्हरमध्ये सिक्स बसला त्यानंतर पूढच्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. तेजा निदामनुरु मोठा फटका मारण्याच्या नादात लाँग ऑनला कॅच उडाला, तो कॅच मोहम्मद शमीने पकडत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पाह व्हिडीओ-:

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

रोहितने शेवटची बॉलिंग वन डे क्रिकेटमध्ये 9 वर्षांआधी केली होती. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. रोहितशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलही नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करताना दिसले. कोहलीने तीन ओव्हरमध्ये 13 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला आऊट केलं.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.