Team India Catptain | टीम इंडियाचा कर्णधार बदलणार, या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

indian cricket team captain | एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या तोंडावर भारतीय संघाचा कर्णधार बदलण्यात येणार असल्याची अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या आता टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार आहे.

Team India Catptain | टीम इंडियाचा कर्णधार बदलणार, या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 5:49 PM

राजकोट | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. वर्ल्ड कपला आजपासून मोजून 9 दिवस शिल्लक आहेत. या क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी करणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाने ही 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. कॅप्टन केएल राहुल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही सीरिज जिंकत कांगारुंना पाणी पाजलं.

टीम इंडियाने मोहालीत ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचे आव्हान दिले. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं नवं लक्ष्य मिळालं. मात्र टीम इंडियाने कांगारुंना 217 धावांवर ऑलआऊट करत मालिका जिंकली. दरम्यान आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी आणि वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा कर्णधार बदलणार आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन कोण?

रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने सोमवारी 18 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानुसार पहिल्या 2 सामन्यांसाठी केएल राहुल याला कर्णधार आणि रवींद्र जडेजा याला उपकर्णधार करण्यात आलं होतं. तर नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या चौघांना विश्रांती देण्यात आली. तर हे चौघे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळणार असल्याचं जाहीर केलं.

त्यानुसार आता तिसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा हा टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे.

दरम्यान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून टीम इंडियाचा ऑलराउंडर अक्षर पटेल हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. अक्षरला आशिया कप स्पर्धेत दुखापत झाली होती.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

तिसऱ्या आणि फायनल वनडेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी आणि मोहम्मद सिराज.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.