कोरोनाबाधित वडिलांवर आयपीएलचा सगळा पैसा खर्च करणार, 22 वर्षीय चेतन साकरियाच्या संघर्षाची कथा!

आयपीएलच्या 14 व्या पर्वातून मिळालेला पैसा चेतन साकरिया आपल्या वडिलांच्या कोरोनावरील उपचारासाठी खर्च करणार आहे. (RR Chetan Sakaria will spend all money he got from IPL 2021 on the corona Affected father)

कोरोनाबाधित वडिलांवर आयपीएलचा सगळा पैसा खर्च करणार, 22 वर्षीय चेतन साकरियाच्या संघर्षाची कथा!
चेतन साकरिया
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 10:13 AM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वात राजस्थान रॉयल्सने सौराष्ट्रच्या एका युवा बोलर्सला संधी दिली आणि त्याने संधीचं सोनं नाही तर हिरे मोती केले. 22 वर्षीय चेतन साकरियाने (Chetan Sakariya) आपल्या कामगिरीने दिग्गजांनाही आपली दखल घ्यायला भाग पाडलं. धोनीला आऊट करण्यासाठी भले भले गोलंदाज त्रस्त होतात पण चेतनने चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये एका झटक्यात धोनीला आऊट केलं. आता त्याच चेतनवर मोठं संकट उभा राहिलं आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा प्रकोप सुरु असताना चेतनच्या वडिलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावरील उपचारासाठी चेतन आयपीएलमधून मिळालेली सर्व रक्कम खर्च करणार आहे. (RR Chetan Sakaria will spend all money he got from IPL 2021 on the corona Affected father)

चेतन साकरियाच्या वडिलांना कोरोनाची बाधा

चेतन साकरियाचे वडील कोरोनाविरुद्धची लढाई लढतायत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेतायत. अशातच आयपीएल देखील स्थगित झाल्याने आता चेतनला वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळालाय. तो सध्या त्याच्या भावनगरमधील घरी आहे.

वडिलांच्या उपचारासाठी आयपीएलमधून मिळालेले पैसे खर्च करणार

चेतन साकरियाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत कौटुंबिक विषयावर भाष्य केलं. तो म्हणाला, “काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून माझ्या वाट्याचे पैसे मिळालेत. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. वडील कोरोनाविरोधी लढाई लढतायेत. अशा मुश्किल परिस्थितीत ते पैसे माझ्या कुटुंबाच्या कामी येतील. जेणेकरुन माझ्या वडिलांवर मी चांगले उपचार करु शकेन.”

चेतनचा गरिबीशी संघर्ष

डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया साधारण कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन आला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे वडील टेम्पोचालक होते. तर पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्याच्या चुलत्याने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला. आता चेतनने आयपीएल खेळून कुटुंबाचं नशीब उजळवलं.

आयपीएलमध्ये पदार्पण

चेतन साकरियाने यंदाच्या साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने चमकदार कामगिरी केली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केली. राजस्थानने खेळलेल्या सहा सामन्यांत त्याने उत्तम गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात 1.20 कोटी रुपयांत चेतनला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं होतं.

चेतनची क्रिकेट कारकीर्द

चेतन सौराष्ट्रच्या वतीने देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अलीकडेच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. यात त्याने पाच सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या होत्या आणि त्याचा इकोनॉमी 5 च्या आसपास होता. गेल्या वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 23 वर्षीय सकारियाने मोठ्या संघर्षासह त्याचं क्रिकेट करिअर बनवलं आहे.

(RR Chetan Sakaria will spend all money he got from IPL 2021 on the corona Affected father)

हे ही वाचा :

World Test Championship final 2021 : BCCI चं पुन्हा दुर्लक्ष, भारतीय संघातील फिरकीपटूचं करिअर संपण्याच्या मार्गावर!

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवला पोहोचताच माईक हसीने दिली चेन्नईला गुड न्यूज!

World Test Championship final 2021 : निवड समितीवर आक्षेप नोंदवणारे हे 4 सवाल, फॅन्स विचारतायत या प्रश्नांची उत्तरं

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.