RR vs CSK : नितीश राणाचा चेन्नईवर ‘हल्ला बोल’, सीएसकेसमोर 183 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Rajasthan Royals vs Chennai Super Kings 1st Innings : नितीश राणा याने केलेल्या 81 धावांच्या जोरावर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावांपर्यंत मजल मारली आहे.

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 11 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. राजस्थानासाठी नितीश राणा (Nitish Rana) याने सर्वाधिक धावा केल्या. तसेच कर्णधार रियान पराग यानेही 30 पेक्षा अधिक धावांचं योगदान दिलं. तसेच संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनाही दुहेरी आकडा गाठला. मात्र इतरांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे राजस्थानला स्फोटक सुरुवातीनंतरही 200 पार पोहचता आलं नाही.
राजस्थानची बॅटिंग
नितीश राणा याने 36 चेंडूत 81 धावा केल्या. नितीशने या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. कर्णधार रियान पराग याने 28 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 37 रन्स केल्या. संजू सॅमसन याने 16 बॉलमध्ये 20 रन्स केल्या आणि मैदानाबाहेर गेला. तर शिमरॉन हेटमायरने 19 रन्स केल्या. या चौघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. यशस्वी जयस्वाल आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 4 धावा केल्या. ध्रुव जुरेलने 3 रन्स केल्या. तसेच चेन्नईकडून तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
चेन्नईसाठी खलील अहमद, नूर अहमद आणि मथीशा पथीराणा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि जेमी ओव्हरटन या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान राजस्थान आणि चेन्नई या दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. चेन्नईने विजयी सुरुवातीनंतर दुसरा सामना गमावलाय. तर राजस्थानने सलग दोन्ही सामने गमावलेत. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
चेन्नईसमोर 183 धावांचं आव्हान
Innings Break!
Powered by Nitish Rana’s blistering knock, #RR set a target 🎯 of 1️⃣8️⃣3️⃣#CSK aim to chase this successfully for the coveted 2 points
Scorecard ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/fGtgMaWze7
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना आणि खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.