RR vs GT : कॅप्टन शुबमन गिल याचं अर्धशतक, गुजरात राजस्थानचा विजयी रथ रोखणार?
Shubman Gill Fifty RR vs GT IPL 2024 : गुजरात टायटन्सने झटपट विकेट्स गमावल्यानंतर कॅप्टन शुबमन गिल याने अर्धशतक ठोकत टीमचा डाव सावरलाय. तसेच विजयाच्या आशा कायम राखल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याने झुंजार अर्धशतक ठोकलं आहे. शुबमन गिल याने 35 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 142.86 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. शुबमन गिल याचं हे आयपीएल कारकीर्दीतील 20 वं अर्धशतक ठरलं. शुबमनच्या या अर्धशतकानंतर गुजरातच्या विजयाच्या आशा कायम आहेत. आता शुबमन गुजरातला विजय मिळवून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरातला 197 धावांचं आव्हान
दरम्यान राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. राजस्थानकडून रियान पराग याने सर्वाधिक 76 धावा केल्या. रियानने या खेळीत 48 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 सिक्स ठोकले. कॅप्टन संजू सॅमसन याने 38 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची नाबाद खेळी केली.
तर ओपनर यशस्वी जयस्वाल याने 19 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. यशस्वीच्या खेळीत 5 चौकारांचा सावेश होता. तर जॉस बटलर याने 10 बॉलमध्ये 8 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायर 5 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 13 धावा केल्या. तर उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्मा या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
शुबमन गिल याचं अर्धशतक
Half-century for Shubman Gill!
Can the @gujarat_titans Captain guide his side to a win in a tricky chase? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/1HcL9A97Ch #TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/UZ1Lryt2KM
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद आणि मोहित शर्मा.