RR vs GT : रियान परागचा इम्पॅक्ट नाहीच, उलट राजस्थानची डोकेदुखी वाढली! मजेशीर मीम्सचा वर्षाव, तुम्हीही हसाल

IPL 2023 स्पर्धेतील 48 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरातने राजस्थानला पराभवाचं पाणी पाजलं. असं असलं तरी रियान परागची पुन्हा चर्चा रंगली आहे.

RR vs GT : रियान परागचा इम्पॅक्ट नाहीच, उलट राजस्थानची डोकेदुखी वाढली! मजेशीर मीम्सचा वर्षाव, तुम्हीही हसाल
RR vs GT : रियान परागला पुन्हा संधी मिळूनही फ्लॉप; डीआरएसपण घालवला वाया, मजेशीर मीम्स पाहून हसून हसून पोट दुखेल
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 12:49 AM

मुंबई : आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या दोन सामन्यात राजस्थानने पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून प्लेऑफसाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. गुजरात मोठ्या फरकारने हरवल्याने रनरेटवरही फरक पडला आहे. राजस्थानने 17.5 षटकात सर्व गडी बाद 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरातने 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात राजस्थानचा रियान पराग पुन्हा फेल झाला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने रियान परागला प्लेइंगे इलेव्हनमध्ये स्थान दिलं. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला गुजरात विरुद्ध संधी देण्यात आली. जेणेकरून चांगली कामगिरी करून संघाला मदत होईल. पण या सामन्यातही रियान पराग अपयशी ठरला. पण 4 चेंडूत फक्त 6 धावा करून तंबूत परतला.

रियान पराग राशीद खानच्या गोलंदाजीवर स्पष्टपणे पायचीत झाला होता. मात्र असं असूनही त्याने डीआरएस घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये तो सपशेल आऊट असल्याचं सिद्ध झालं आणि डीआरएस वाया गेला. दुसरीकडे ध्रुव जुरेल पायचीत झाला तेव्हा तो डाउटफूल होता. त्यावेळी डीआरएस नसल्यानं काहीच करता आलं नाही.

रियानने संपूर्ण सिझनमध्ये सहा सामन्यात फक्त 58 धावा केल्या आहेत. त्याची कामगिरी पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. आता काही मीम्स नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

राजस्थान रॉयल्सचा रियान पराग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सामन्यापूर्वी मोठ्या मोठ्या गोष्टी करताना दिसतो. मात्र फलंदाजीवेळी एकदम फुस होऊन जातो. त्याला फलंदाजी करता येत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. जेव्हा संघाला त्याची गरज असते तेव्हाच तो फ्लॉप ठरतो.

दोन्ही संघाचे खेळाडू

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.