RR vs KKR, IPL 2021 Match 18 Result | कर्णधार संजू सॅमसनची नाबाद संयमी खेळी, राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय

| Updated on: Apr 24, 2021 | 11:31 PM

RR vs KKR 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने

RR vs KKR, IPL 2021 Match 18 Result | कर्णधार संजू सॅमसनची नाबाद संयमी खेळी, राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय
RR vs KKR 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने

मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.या सामन्याचे आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium Mumbai) करण्यात आले होते.  (rr vs kkr live score ipl 2021 match rajasthan royals vs Kolkata knight riders scorecard online wankhede stadium mumbai in marathi)

Key Events

कर्णधार सॅमसनची संयमी खेळी

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संयमी खेळी केली. संजूने 41 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 42 धावा केल्या. संजू सॅमसनने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली.

कोलकाताचा वानखडेवरील नववा पराभव

कोलकाताची वानखेडेवरील हा नववा पराभव ठरला आहे. कोलकाताने आतापर्यंत वानखेडेवर एकूण 10 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 1 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर उर्वरित 9 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 24 Apr 2021 11:24 PM (IST)

    राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

    राजस्थानने कोलकातावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

  • 24 Apr 2021 10:59 PM (IST)

    राजस्थानला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 30 धावांची आवश्यकता

    कोलकाताला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. डेव्हिड मिलर आणि कर्णधार संजू सॅमसन मैदानात खेळत आहेत.

  • 24 Apr 2021 10:47 PM (IST)

    राजस्थानला चौथा झटका

    राजस्थानला चौथा झटका लागला आहे. राहुल तेवतिया कॅच आऊट झाला आहे. तेवतियाने 5 धावा केल्या.

  • 24 Apr 2021 10:43 PM (IST)

    शुबमनकडून राहुल तेवतियाला जीवनदान

    शुबमन गिलने सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये राहुल तेवतियाला जीवनदान दिलं. राहुलने जोरदार फटका मारला. हा मारलेला फटका जवळपास सिक्स होता. मात्र शुबमनने सीमारेषेजवळ हा कॅच घेतला. मात्र बाऊंड्री लाईन जवळ असल्याने शुबमनचा तोल गेला. त्यामुळे त्याने चेंडू दुर फेकला. मात्र तो किती दूर फेकायचा याचा योग्य अंदाज शुबमनला लावता आला नाही. यामुळे राहुलला जीवनदान मिळालं.

  • 24 Apr 2021 10:36 PM (IST)

    राजस्थानचा 11 ओव्हरनंतर स्कोअर

    राजस्थानने 11 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 85 धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे.  कर्णधार संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया मैदानात खेळत आहेत.

  • 24 Apr 2021 10:33 PM (IST)

    राजस्थानला तिसरा धक्का

    राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे.  शिवम दुबे आऊट झाला आहे. दुबेने 22 धावा केल्या. 
     
     
  • 24 Apr 2021 10:20 PM (IST)

    संजू सॅमसनचा सिक्स

    संजू सॅमसनने 9 वव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 74 मीटर लांबीचा सिक्सर लगावला आहे.

  • 24 Apr 2021 10:14 PM (IST)

    पावर प्लेनंतर राजस्थानचा स्कोअर

    राजस्थानने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून  50 धावा केल्या.

  • 24 Apr 2021 10:10 PM (IST)

    शिवम दुबेचा झक्कास सिक्स

    शिवम दुबेने 6 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 74 मीटर लांबीचा सिक्स लगावला.

  • 24 Apr 2021 10:05 PM (IST)

    राजस्थानला दुसरा धक्का

    राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे.  यशस्वी जयस्वाल कॅच आऊट झाला आहे. यशस्वीने 17 चेंडूत 5 चौकारांसह 22 धावांची खेळी केली.

  • 24 Apr 2021 09:59 PM (IST)

    चौथ्या ओव्हरमध्ये 3 चौकार

    राजस्थानने चौथ्या ओव्हरमध्ये एकूण 3 चौकार लगावले. राजस्थानच्या 4  ओव्हरनंतर 1 आऊट 30 रन्स झाल्या आहेत.

  • 24 Apr 2021 09:57 PM (IST)

    कर्णधार संजू सॅमसनची चौकाराने सुरुवात

    कर्णधार संजू सॅमसनने चौकाराने सुरुवात केली आहे. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर चौकार लगावला.

  • 24 Apr 2021 09:55 PM (IST)

    राजस्थानला पहिला धक्का

    राजस्थानला पहिला धक्का बसला आहे.जॉस बटलर आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्थीने बटलरला एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 24 Apr 2021 09:43 PM (IST)

    यशस्वीचे सलग 2 चौकार

    यशस्वी जयसवालने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.

  • 24 Apr 2021 09:36 PM (IST)

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. कोलकाताने राजस्थानला विजयासाठी  134 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 24 Apr 2021 09:25 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान

    कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने 25 तसेच नितीश राणाने 22 धावा केल्या. राजस्थानकडून ख्रिस मॉरीसने 4 विकेट्स घेतल्या.

  • 24 Apr 2021 09:12 PM (IST)

    कोलकाताला सातवा धक्का

    कोलकाताला सातवा धक्का बसला आहे. दिनेश कार्तिक आऊट झाला आहे. कार्तिकने 25 धावा केल्या.

  • 24 Apr 2021 09:10 PM (IST)

    कोलकाताला सहावा धक्का

    कोलकाताला सहावा धक्का बसला आहे. आंद्रे रसेल 9 धावांवर कॅच आऊट झाला. 
     
     
  • 24 Apr 2021 08:59 PM (IST)

    कोलकाताला पाचवा धक्का

    कोलकाताला पाचवा धक्का बसला आहे. राहुल त्रिपाठी बाद झाला. राहुल त्रिपाठीने 36 धावा केल्या.

  • 24 Apr 2021 08:39 PM (IST)

    कोलकाताचा 13 ओव्हरनंतर स्कोअर

    कोलकाताने 13 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 76 धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठी 33 तर दिनेश कार्तिक 2 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 24 Apr 2021 08:31 PM (IST)

    कोलकाताला चौथा धक्का

    कोलकाताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार इयोन मॉर्गन डायमंड डक झाला आहे. मॉर्गन शून्य धावांवर एकही चेंडू न खेळता रन आऊट झाला आहे.

  • 24 Apr 2021 08:26 PM (IST)

    कोलकाताला तिसरा धक्का

    कोलकाताने तिसरी विकेट गमावली आहे. सुनील नारायण कॅच आऊट झाला आहे. यशस्वी जयस्वालने शानदार कॅच घेतला. सुनीलने 6 धावा केल्या.

  • 24 Apr 2021 08:17 PM (IST)

    कोलकाताला दुसरा धक्का

    कोलकाताला दुसरा धक्का बसला आहे. नितीश राणा आऊट झाला आहे. नितीशने 25 चेंडूत 1 सिक्स आणि 1 फोरसह 22 धावा केल्या आहेत.

  • 24 Apr 2021 08:05 PM (IST)

    नितीश राणाचा जोरदार सिक्स

    नितीश राणाने 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जयदेव उनाडकटच्या बोलिंगवर सिक्स लगावला आहे.

  • 24 Apr 2021 08:02 PM (IST)

    कोलकाताचा पावर प्लेनंतर स्कोअर

    कोलकाताने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर 1 विकेट्स गमावून 25 धावा केल्या आहेत.

  • 24 Apr 2021 07:59 PM (IST)

    कोलकाताला पहिला धक्का

    कोलकाताला पहिला धक्का बसला आहे. शुबमन गिल 11 धावांवर रन आऊट झाला आहे.

  • 24 Apr 2021 07:54 PM (IST)

    कोलकाताचा 5 ओव्हरनंतर स्कोअर

    कोलकाताने 5 ओव्हरनंतर बिनबाद 23 धावा केल्या आहेत. शुबमन गिल 11 तर नितीश राणा 10 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 24 Apr 2021 07:51 PM (IST)

    यशस्वीकडून शुबमनला जीवनदान

    यशस्वी जयसवालने शुबमन गिलला जीवनदान दिलं आहे. शुबमनने सामन्यातील चौथ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर फटका मारला होता. मात्र यशस्वीने ही कॅच सोडली.

  • 24 Apr 2021 07:47 PM (IST)

    गिलचा शानदार फोर

    शुबमन गिलने चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार लगावला आहे.

  • 24 Apr 2021 07:42 PM (IST)

    नितीश राणाचा चौकार

    नितीश राणाने सामन्यातील तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.

  • 24 Apr 2021 07:33 PM (IST)

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. शुबमन गिल-नितीश राणा सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 24 Apr 2021 07:21 PM (IST)

    राजस्‍थान रॉयल्‍सचे अंतिम 11 खेळाडू

    संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयसवाल, जोस बटलर, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया आणि मुस्‍तफिजुर रहमान.

  • 24 Apr 2021 07:20 PM (IST)

    कोलकाता नाइट राइडर्सची प्लेइंग इलेव्हन

    ऑयन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.

  • 24 Apr 2021 07:17 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर मनन व्होराच्या जागी युवा यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे. तर स्पिन श्रेयस गोपाळच्या जागी मीडियम पेसर जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे.

    तसेच कोलकातामध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीऐवजी वेगवान गोलंदाज शिवम मावीचा समावेश करण्यात आला आहे.

  • 24 Apr 2021 07:08 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला

    राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • 24 Apr 2021 06:37 PM (IST)

    राजस्थान विरुद्ध कोलकाता आमनेसामने

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघ पॉइंट्स टेबसमध्ये तळाशी आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाच असणार आहेत.

Published On - Apr 24,2021 11:24 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.