Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs KKR Score, IPL 2025 : कोलकाताचा पहिला विजय, राजस्थानवर 8 विकेट्सने मात

| Updated on: Mar 27, 2025 | 12:01 AM

Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Score And Highlights in Marathi : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात केकेआरने राजस्थानचा एकतर्फी सामन्यात 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

RR vs KKR Score, IPL 2025 : कोलकाताचा पहिला विजय, राजस्थानवर 8 विकेट्सने मात
Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Live Updates Ipl 2025Image Credit source: Tv9

आयपीएलच्या 18 व्या मोसामातील (IPL 2025) सहाव्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने  राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. राजस्थानने कोलकाताला गुवाहाटातील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. क्विंटन डी कॉक हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. क्विंटन डी कॉक याने केकेआरसाठी नाबाद 97 धावांची खेळी केली. तर अंगकृष रघुवंशी याने 22 धावांचं योगदान दिलं. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 18 धावा केल्या. तर मोईन अलीने 5 रन्स केल्या. केकेआरचा हा या मोसमातील दुसऱ्या सामन्यातील पहिला विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानला सलग दुसरा सामना गमवावा लागला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Mar 2025 10:59 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाताचा पहिला विजय, राजस्थानवर 8 विकेट्सने मात

    कोलकाताने  राजस्थानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. केकेआरने 152 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. केकेआरने 17.3 ओव्हरमध्ये 153 धावा केल्या. क्विटंन डी कॉकर याने सर्वाधिक आणि नाबाद 97 धावांची खेळी केली.  केकेआरचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.

  • 26 Mar 2025 10:55 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाता पहिल्या विजयाच्या दिशेने, 18 बॉलमध्ये 17 रन्सची गरज

    कोलकाताला  पहिल्या विजयासाठी 18 बॉलमध्ये 17 रन्सची गरज आहे. केकेकआरने 17 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 135 धावा केल्या आहेत. राजस्थानने केकेआरला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 26 Mar 2025 10:21 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कॅप्टन अजिंक्य रहाणे आऊट, कोलकाताला दुसरा झटका

    कोलकाताला दुसरा आणि मोठा झटका लागला आहे.  कॅप्टन अजिंक्य रहाणे 18 धावांवर आऊट झााला आहे. वानिंदु हसरंगा याने अजिंक्यला तुषार देशपांडे याच्या हाती कॅच आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

  • 26 Mar 2025 10:00 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाताला पहिला झटका, मोईन अली रन आऊट

    कोलकाताने पहिली विकेट गमावली आहे.  मोईन अली 5 धावांवर रन आऊट झाला आहे.

  • 26 Mar 2025 09:37 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात, डी कॉक-मोईन अली सलामी जोडी मैदानात

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून क्विंटन डी कॉक आणि मोईन अली सलामी जोडी मैदानात आली आहे. राजस्थानने केकेआरला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 26 Mar 2025 09:17 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकातासमोर 152 धावांंचं आव्हान

    राजस्थानने कोलकाताला विजयासाठी 152 धावांंचं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 151 धावा केल्या आहेत.

  • 26 Mar 2025 09:06 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : ध्रुव जुरेल 33 धावा करुन आऊट

    राजस्थान रॉयल्सने सातवी विकेट गमावली आहे. ध्रुव जुरेल 33 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 26 Mar 2025 08:51 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थानला सहावा धक्का, शुबम दुबे आऊट

    केकेआरने राजस्थानला सहावा धक्का दिला आहे. शुबम दुबे 9 रन्स करुन आऊट झाला आहे.

  • 26 Mar 2025 08:32 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : नितीश राणा 8 रन्स करुन बोल्ड

    मोईन अली याने नितीश राणा याला 8 धावांवर बोल्ड केलंय. केकेआरने यासह राजस्थानला पाचवा झटका दिला.

  • 26 Mar 2025 08:26 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थानला चौथा धक्का, वानिंदू हसरंगा स्वस्तात माघारी

    कोलकाताने राजस्थानला चौथा झटका दिला आहे. वरुण चक्रवर्ती याने वानिंदू हसरंगा याला कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या हाती 4 धावांवर कॅच आऊट केलं.

  • 26 Mar 2025 08:13 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : रियाननंतर यशस्वी जयस्वाल माघारी, राजस्थानला तिसरा धक्का

    राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. कर्णधार रियान पराग याच्यानंतर ओपनर यशस्वी जयस्वाल 24 बॉलमध्ये 29 रन्स करुन आऊट झालाय.

  • 26 Mar 2025 08:10 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कर्णधार रियान पराग माघारी

    राजस्थानने दुसरी विकेट गमावली आहे. कर्णधार रियान पराग आऊट झाला आहे. वरुण चक्रवर्ती याने रियानला 25 धावांवर विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 26 Mar 2025 07:52 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थानला पहिला झटका, संजू सॅमसन आऊट

    कोलकाताने राजस्थानला पहिला झटका दिला आहे. वैभव अरोरा याने संजू सॅमसनला 13 रन्सवर बोल्ड केलं.

  • 26 Mar 2025 07:37 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात, यशस्वी-संजू सलामी जोडी मैदानात

    राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्याला सुुरुवात झाली आहे. कोलकाताने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन (इमपॅक्ट प्लेअर) ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 26 Mar 2025 07:10 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन 

    कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

  • 26 Mar 2025 07:10 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.

  • 26 Mar 2025 07:02 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाताने टॉस जिंकला

    राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 26 Mar 2025 06:49 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : थोड्याच वेळात टॉस

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार आहे. कोणता संघ टॉस जिंकणार? याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

  • 26 Mar 2025 05:59 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स टीम

    कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.

  • 26 Mar 2025 05:58 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थान रॉयल्स टीम

    राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन, कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.

  • 26 Mar 2025 05:36 PM (IST)

    RR vs KKR Live Updates : राजस्थान विरुद्ध कोलकाता आमनेसामने

    आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात राजस्थान विरुद्ध कोलकाता आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. या सामन्याबाबत आपण प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.

Published On - Mar 26,2025 5:35 PM

Follow us
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.