RR vs KKR : सुनील नरीनला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बसवलं, अजिंक्य रहाणेने सांगितलं काय झालं ते
आयपीएल 202 स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. असं असताना कोलकात्याने दुसऱ्या सामन्यात स्टार खेळाडू सुनील नरीनला बसवलं. त्याचं कारण अजिंक्य रहाणेनं सांगितलं.

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तर विजय मिळवणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक जण पहिल्या टप्प्यात विजयासाठी आतुर असतो. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांची स्पर्धेतील सुरुवात काही चांगली झाली नाही. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. नाहीतर सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागेल. त्यानंतर दडपण वाढेल ते वेगळं.. असं असताना कोलकाता नाईट रायडर्सला दुसऱ्या सामन्यात धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू सुनील नरीन दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे कोलकात्याचं काही खरं नाही असंच वाटत आहे. महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे याने असा का निर्णय घेतला असेल तर त्याचं कारणंही त्याने स्पष्ट केलं आहे.
अजिंक्य रहाणेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यानंतर प्लेइंग 11 बाबत सांगताना म्हणाला की, ‘आम्ही म गोलंदाजी करणार आहोत. विकेट खरोखरच चांगली दिसते. जर आपण प्रथम गोलंदाजी केली तर आपल्याला ही विकेट कशी आहे याची कल्पना येईल. येथे दव घटक खूप मोठा आहे. सकारात्मक राहण्याबद्दल आहे, या स्वरूपात निर्भय राहून खेळणे महत्त्वाचं आहे. आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलो, टी20 म्हणजे दररोज आपले सर्वोत्तम देणे. आम्ही या सामन्याची वाट पाहत आहोत. आम्ही गेल्या सामन्यातून बरेच काही शिकलो. आम्हाला सध्याच्या क्षणात टिकून राहायचे आहे. मी स्टार्सकडे फारसे पाहत नाही, माझ्यासाठी ते सर्व योगदान देण्याबद्दल आहे. सुनील नरीन या सामन्यात खेळणार नाही, त्याला बरं वाटत नाही. त्याच्या जागी मोईन अली संघात खेळेल.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा