RR vs LSG Live Score : लखनऊ संघाचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय, सामना जिंकत लखनऊने रचला इतिहास

| Updated on: Apr 19, 2023 | 11:44 PM

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL 2023 Live Score in Marathi : Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL 2023 Live Score in Marathi : चार वर्षांनंतर यपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज राजस्थान आज पहिला सामना खेळणार आहे. 27 एप्रिल 2019 ला शेवटचा सामना इथे पार पडला होता.

RR vs LSG Live Score : लखनऊ संघाचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, सामना जिंकत लखनऊने रचला इतिहास

RR vs LSG Live Score : चार वर्षांनंतर जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलचा सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर संजू सॅमसन पहिल्यांदाच संघाची धुरा सांभाळत आहे. राजस्थान रॉयल्ससमोर लखनऊचं आव्हान आहे. सलग 3 सामन्यांसह एकूण 4 विजयांसह राजस्थान पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ केएल राहुलची लखनऊ आहे. लखनऊने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. आज जर सामना जिंकला तर पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचं पहिले स्थान हिरावून घेऊ शकतात.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 19 Apr 2023 11:28 PM (IST)

    राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाचा 11 धावांनी पराभव झालेला आहे. लखनऊने दिलेल्या 154 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला निर्धारित 20 षटकात 144 धावाच करता आल्या. चांगल्या सुरूवातीनंतरही राजस्थान संघाला विजय मिळवता आला नाही.

  • 19 Apr 2023 11:12 PM (IST)

    राजस्थान संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये धावांची 19 गरज, पडिक्कल आणि पराग मैदानात. लखनऊकडून आवेश खान गोलंदाजीला.

  • 19 Apr 2023 11:02 PM (IST)

    राजस्थानला चौथा झटका बसला असून हेटमायर बाद झाला आहे. आवेश खानने त्याला 2 धावांवर आऊट केलं आहे. आरआरला आता पराग आणि पडिक्क यांच्याकडूनच अपेक्षा आहेत.

  • 19 Apr 2023 10:46 PM (IST)

    राजस्थान अडचणीत

    RR vs LSG Live Score :

    राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का बसला असून सलामीवीर जोस बटलर 40 धावांवर माघारी परतला आहे. लखनऊच्या रवी बिश्नोईने त्याला आऊट केलं.

  • 19 Apr 2023 10:41 PM (IST)

    राजस्थानला लागोपाठ धक्के

    RR vs LSG Live Score : 13 ओव्हर 95-2

    राजस्थान संघाला दुसरा झटका बसला आहे. बटलर आणि संजू यांच्यात झालेल्या चुकीच्या कॉलमुळे संजू रन आऊट झाला आहे. 2 धावांवर संजू माघारी परतला असून आता मैदानात पडिक्कल आला आहे.

  • 19 Apr 2023 10:33 PM (IST)

    राजस्थानला पहिला धक्का

    RR vs LSG Live Score :

    जशस्वी जयस्वाल 44 धावा काढून परतला आहे. या खेळीमध्ये त्याने  4 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र मार्कस स्टोइनिसने त्याला माघारी पाठवलं.

    .

  • 19 Apr 2023 09:58 PM (IST)

    राजस्थानची जबरदस्त सलामी

    RR vs LSG Live Score :

    राजस्थान रॉयल्स संघाच्या डावाला सुरूवात झाली आहे. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सहा ओव्हरमध्ये 47 धावा केल्या आहेत. यामध्ये बटलरने 27 धावा आणि जयस्वालने 15 धावा केल्या आहेत.

  • 19 Apr 2023 09:43 PM (IST)

    RR vs LSG Live Score:

    राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 154 धावा केल्या आहेत. लखनऊ संघाकडून सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक 51 धावा तर के.एल. राहुल याने 39 धावा केल्या. शेवटला येत निकोलस पूरन 29 आणि स्टोइनिसने 21 धावा करत संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

  • 19 Apr 2023 09:06 PM (IST)

    RR vs LSG Live Score : 19 व्या ओव्हरमध्ये लखनऊची जोरदार फटकेबाजी, पूरनने होल्डरला धू-धू धुतलं, 17 धावा केल्या वसूल

  • 19 Apr 2023 08:43 PM (IST)

    RR vs LSG Live Score:

    आश्विनने एकाच ओव्हरमध्ये दीपक हुडा आणि मेयर्स याला बाद केलं आहे. 14 ओव्हरमध्ये लखनऊने 104 धावा केल्या आहेत. मैदानात मार्कस आणि निकोलस पूरन मैदानात आहेत.

  • 19 Apr 2023 08:40 PM (IST)

    RR vs LSG Live Score :

    दीपक हुडा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळू शकला नाही आणि केवळ 2 धावा करून बाद झाला. 14व्या षटकात रविचंद्रन अश्विनने त्याला आऊट केल. डीप मिडविकेटच्या दिशेने स्लॉग स्वीप मारला पण हेटमायरने चांगला झेल घेतला.

  • 19 Apr 2023 08:30 PM (IST)

    बदोनी आला आणि गेला

    RR vs LSG Live Score:

    राजस्थान संघाने दुसरा झटका लखनऊला दिला आहे. के. एल. राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीच्य क्रमामध्ये लखनऊने बदल केला होता. आयुश बदोनी याला पाठवलं होतं मात्र 1 रनवर बोल्टने बोल्ड आऊट केलं आहे.

  • 19 Apr 2023 08:24 PM (IST)

    लखनऊला पहिला झटका

    RR vs LSG Live Score:

    जेसन होल्डर यान लखनऊ संघाचा कर्णधार के.एल. राहुल याला कॅच आऊट केलं आहे. राहुल 39 धावा करून मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आहे.

  • 19 Apr 2023 08:07 PM (IST)

    लखनऊची स्लो सुरूवात

    RR vs LSG Live Score:

    पॉवर प्लेमध्ये राजस्थान संघाने37 धावा केल्या आहेत. यामध्ये राहुलने 19 तर मेयर्सने 18 धावा केल्या आहेत. राजस्थानने कॅच सोडले आहेत त्यामुळे याचा पुढे किती फायदा घेतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 19 Apr 2023 07:50 PM (IST)

    राजस्थानची कडक बॉलिंग

    RR vs LSG Live Score:

    राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने पहिले ओव्हर मेडन टाकली. लखनऊने सावध सुरूवात केली असून 4 ओव्हरमध्ये 18 धावा केल्या आहेत. के. एल. राहुल नाबाद 8 धावा, काइल मेयर्स नाबाद 9 धावा

  • 19 Apr 2023 07:31 PM (IST)

    सामना सुरू

    RR vs LSG Live Score:

    लखनऊकडून के. एल. राहुल आणि काइल मेयर्स मैदानात, पहिली ओव्हर ट्रेंट बोल्ट टाकत आहे.

  • 19 Apr 2023 07:23 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    RR vs LSG Live Score : राजस्थानने मोठा बदल केला असून जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक लखनऊकडून पदार्पण करत आहे.

  • 19 Apr 2023 07:19 PM (IST)

    के. एल. साठी हा बॉलर ठरणार डोकेदुखी

    RR vs LSG Live Score :

    के. एल. राहुल आणि ट्रेंट बोल्डमध्ये रंगणार चुरस, 8 इनिंगपैकी 2 वेळा राहुलला त्याने तंबूचा मार्ग दाखवला आहे.

  • 19 Apr 2023 07:16 PM (IST)

    दोन संघांचे इम्पॅक्ट खेळाडू

    इम्पॅक्ट खेळाडूंची यादी

    लखनौ सुपर जायंट्स: अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, कृष्णप्पा गौथम, प्रेरक मांकड, डॅनियल सॅम्स

    राजस्थान रॉयल्स : देवदत्त पडिक्कल, मुरुगन अश्विन, डोनाव्हॉन फरेरा, नवदीप सैनी, जो रूट

  • 19 Apr 2023 07:13 PM (IST)

    RR vs LSG Live Score:

    अॅडम जम्पाला बाहेरचा रस्ता तर सलामीवीर डिकॉकला अजूनही करावी लागणार प्रतीक्षा

  • 19 Apr 2023 07:08 PM (IST)

    दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन 

    RR vs LSG Live Score:

    राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

    लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई

  • 19 Apr 2023 07:02 PM (IST)

    RR चा बॉलिंगचा निर्णय

    RR vs LSG Live Score:  राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 19 Apr 2023 06:58 PM (IST)

    पहिला विजय मिळवण्याच उत्सुक

    RR vs LSG IPL 2023 Live Score :

    मागील मोसमात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात दोन सामने झाले होते. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले होते. पहिल्या सामन्यात राजस्थानने 3 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनच्या संघाने 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे राहुल आणि लखनऊ राजस्थानविरुद्ध पहिल्या विजयासाठी प्रयत्न करतील.

Published On - Apr 19,2023 6:54 PM

Follow us
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....