RR vs LSG : लखनऊनला राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान
Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL 2023 Live Score in Marathi : लखनऊ संघाच्या बॅटर्सना राजस्थानच्या गोलंदाजांनी रोखलं.
मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 154 धावा केल्या आहेत. लखनऊ संघाकडून सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक 51 धावा तर के.एल. राहुल याने 39 धावा केल्या. शेवटला येत निकोलस पूरन 29 आणि स्टोइनिसने 21 धावा करत संघाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.
लखनऊ संघाने एकदम सावध सुरूवात केली होती. राहुल आणि मेयर्स दोघेही मैदानावर तग धरून राहिले होते. कर्णधार के.एल. राहुलला 11 व्या ओव्हरमध्ये जेसन होल्डरने बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर बदोनीला बोल्टने बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन यांनी शेवटला फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं.
राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 2, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या. राजस्थानला दिलेल्या लक्ष्याच्या आतमध्ये रोखत पहिला विजय मिळवण्याचा लखनऊचा प्रयत्न असणार आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई