RR vs PBKS Match Result : संजू सॅमसनचं झंझावाती शतक, शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्यात अपयश, राजस्थान जिंकता जिंकता हरला!
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवला जाणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळवण्यात आलेल्या थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर 221 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने झंझावती शतक झळकावत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवर संजूला षटकार ठोकता आला नाही, त्यामुळे हा सामना राजस्थानने गमावला. दरम्यान, पंजाबकडून अर्शदीप सिंहने उत्तम गोलंदाजी केली, तसेच शेवटच्या चेंडूवर त्याने संजूला बाद करत सामन्याचा निकाल पंजाबच्या बाजूने फिरवला.
LIVE NEWS & UPDATES
-
अर्शदीपने सॅमसनचं वादळ थोपवलं, थरारक सामन्यात पंजाबचा शानदार विजय
अखेरच्या चेंडूवर अर्शदीप सिंहने संजू सॅमसनला बाद केल्याने थरार सामन्यात पंजाबने राजस्थानवर 4 धावांनी विजय मिळवला. सॅमसनची शतकी (119) धावांची खेळी व्यर्थ ठरली.
-
संजू सॅसमनचा सहावा षटकार
9 चेंडूत 20 धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसनने वैयक्तिक सहावा षटकार ठोकत सामन्यातील रॉयल्सचं आव्हान जिंवत ठेवलं आहे.
-
-
राजस्थानचा सहावा फलंदाज माघारी, राहुल तेवतिया 3 धावांवर बाद
राजस्थान रॉयल्स संघ विजयाच्या समीम असताना पंजाबच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूने फिरवला आहे. रायली मेरिडीथने राहुल तेवतियाला बाद करत रॉयल्सला सहावा झटका दिला आहे. (राजस्थान 201/6)
-
संजू सॅमसनचं दमदार शतक, राजस्थानची विजयाच्या दिशेने आगेकूच
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचं अवघ्या 54 चेंडूत दमदार शतक झळकावलं आहे. जे रिचर्डसनच्या गोलंदाजीवर (18 वं षटक) शानदार षटकार आणि चौकार लगावत त्याने शतक साजरं केलं आहे. तसेच राजस्थानची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु आहे. (राजस्थान 198/5)
-
राजस्थानचा पाचवा फलंदाज माघारी, आक्रमक रियान पराग 25 धावांवर बाद
पंजाबच्या गोलंदाजांना पाचवं यश मिळालं आहे. 17 व्या षटकात मोहम्मद शमीने आक्रमक रियान परागला विकेटकीपर के. एल. राहुलच्या हाती झेल द्यायला भाग पाडत पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
-
-
रियान-संजूची फटकेबाजी, राजस्थानची विजयाच्या दिशेने घोडदौड
16 व्या षटकात मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर रियान परागने दोन आणि कर्णधार संजू सॅमसनने एक षटकार ठोकत या षटकातून 20 धावा वसलू केल्या.
-
पंजाबच्या गोलंदाजांना चौथं यश, शिवम दुबे 23 धावांवर बाद
पंजाबच्या गोलंदाजांना चौथं यश मिळालं आहे. शिवम दुबे 23 धावांवर असताना जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर दीपक हुड्डाकडे झेल देत तो बाद झाला. (राजस्थान 123/4)
-
संजू सॅमसनचं दमदार अर्धशतक, राजस्थानची विजयाच्या दिशेने वाटचाल
संघ अडचणीत असताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने दमदार अर्धशतक ठोकत संघाचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं आहे. संजूने 34 चेंडूत 53 धावा फटकावल्या आहेत. (राजस्थान 108/4)
-
राजस्थानला तिसरा धक्का, आक्रमक जॉस बटलर 25 धावांवर बाद
राजस्थानने तिसरी विकेट गमावली आहे. जे रिचर्डसनने आक्रमक जॉस बटलर 25 धावांवर बाद त्रिफळाचित करत सामना पंजाबच्या बाजूने फिरवला.
-
जॉस बटलरचा आक्रमक पवित्रा, रायली मेरीडिथच्या षटकात सलग चार चौकार
रायली मेरीडिथच्या पहिल्याच षटकात (डावातील पाचवं षटक) जॉस बटलरने आक्रमक पवित्रा घेत पहिल्या चार चेंडूत चार चौकार लगावले आहेत. (राजस्थान 48/2)
-
25 धावांवर राजस्थानला दुसरा झटका, मनन वोहरा 12 धावांवर बाद
25 धावांवर राजस्थानचा दुसरा फलंदाज बाद झाला आहे. जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंहने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपत सलामीवीर मनन वोहराला पव्हिलियनचा रस्ता दाखवला.
-
मनन वोहराचा शानदार षटकार
सलामीला आलेल्या मनन वोहराने जे रिचर्डसनला दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकत खात उघडलं आहे. (राजस्थान 11/1)
-
राजस्थानला पहिला झटका, बेन स्टोक्स शून्यावर बाद
222 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला पहिला झटका बसला आहे. पहिल्याची षटकातील तिसऱ्या चेंडूवर राजस्थानला पहिला झटका बसला आहे. मोहम्मद शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपत बेन स्टोक्सला पव्हेलियचा रस्ता दाखवला. (राजस्थान 0/1)
-
पंजाबला पाचवा झटका, के. एल. राहुल 91 धावांवर बाद
पंजाब किंग्सला 20 व्या षटकात मोठा झटका बसला आहे. कर्णधार आणि सलामीवीर के. एल. राहुल 91 धावांवर बाद झाला. चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर राहुल तेवतियाने अप्रतिम झेल टिपत राहुलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
-
पंजाबला चौथा धक्का, निकोलस पूरन शून्यावर बाद
दीपक हुड्डा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या निकलोस पूरनला खातं उघडता आलं नाही. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर चेतन सकारियाने एक अप्रतिम झेल टिपत पूरनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (पंजाब 201/4)
-
के. एल. राहुल आणि डी. हुड्डाची अर्धशतक खेळी, पंजाब 2 बाद 170 वर
के. एल. राहुल आणि डी. हुड्डाची तुफान फटकेबाजी, दोघांचीही अर्धशतकी खेळी, राहूल नाबाद 63 वर, तर हुड्डाचे 6 षटकारांसह नाबाद 50. (पंजाब 170/2)
-
पंजाबला दुसरा धक्का, ख्रिस गेल 40 धावांवर बाद
आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या रुपाने पंजाबला दुसरा धक्का बसला आहे. गेल 40 धावा करुन बाद झाला. रियान परागच्या चेंडूवर बेन स्टोक्सने गेलचा अप्रतिम झेल टिपला
-
गेलचा दुसरा षटकार
राहुल तेवतियाच्या पहिल्या आणि डावातील 9 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ख्रिस गेलने शानदार षटकार ठोकला. (पंजाब 82/1)
-
गेलचं आक्रमण, बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर षटकार
ख्रिस गेलने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेन स्टोक्सच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर गेलने षटकार ठोकला.
-
पंजाबचं अर्धशतक, राहुल-गेलकडून फटकेबाजी
7 व्या षटकात गोलंदाजीसाठी मैदानात आलेल्या श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर के. एल. राहुल आणि ख्रिस गेलने आक्रमण करत या षटकात 11 धावा वसूल केल्या. (पंजाब 58/1)
-
ख्रिस गेलचा पहिला चौकार
ख्रिस गेलने पहिल्यांदाच त्याची आक्रमक शैली दाखवली आहे. गेलने मुस्तफिजूरच्या षटकातील चौथा चेंडू पंचांच्या डोक्यावरुन सीमारेषेपार टोलवत 4 धावा वसूल केल्या. (पंजाब 47/1)
-
मॉरिसच्या गोलंदाजीवर के. एल. राहुलचा चौकार
ख्रिस मॉरिसच्या पहिल्याच षटकात के. एल. राहुलने शानदार चौकार लगावत चांगली सुरुवात केली आहे.
-
राजस्थानला पहिलं यश, मयंक अग्रवाल 14 धावांवर बाद
राजस्थान रॉयल्सला आजच्या सामन्यात पहिलं यश मिळालं आहे. नवोदित गोलंदाज चेतन सकारियाने मयंक अग्रवालला विकेटकिपर संजू सॅमसनकरवी झेलबाद केलं. मयंक 14 धावांवर बाद झाला. (राजस्थान 22/1)
-
चौकाराच्या सहाय्याने मयंक अग्रवालची धडाक्यात सुरुवात
पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर चेतन सकारियाच्या चेंडूवर चौकार लगावात मयंक अग्रवालने डावाची धडाक्यात सुरुवात केली आहे.
-
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन (Playing XI)
पंजाब किंग्स
केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, झाय रिचर्डसन, शाहरुख खान आणि रायली मेरीडिथ
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, बेन स्टोक्स, जॉस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन साकारिया आणि मुस्तफिजुर रहमान.
-
लॉकडाऊनच्या भितीपोटी कल्याण आंबिवलीत खरेदीसाठी उसळली गर्दी
कल्याण : कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी आहे. तर आंबिवली परिसरातही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग रस्त्यावर दिसत आहे. केडीएमसीचे अधिकारी आणि पोलीस कुठेही दिसत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच जमावबंदी लागू असताना दुकाने उघडण्यात आली आहेत.
-
राजस्थानचा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबकडून कर्णधार के. एल. राहुल आणि विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
-
रॉयल्स विरुद्द किंग्स आमनेसामने
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आतापर्यंत 21 वेळा भिडले आहेत. या 21 सामन्यांपैकी 12 सामने राजस्थानने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये पंजाबने बाजी मारली आहे. रॉयल्सने आतापर्यंत एकदा आयपीएलचं विजेतेपद (2008) पटकावलं आहे, तर पंजाबला ही कामगिरी अद्याप करता आलेली नाही. परंतु गेल्या काही मोसमात हे दोन्ही संघ फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. आयपीएल 2020 मध्ये पंजाबचा संघ गुणतालिकेत 6 नंबरला बोता तर राजस्थानचा संघ अगदी तळाशी होता.
Hello and welcome to Match 4 of #VIVOIPL.@IamSanjuSamson led #RR will take on @klrahul11‘s @PunjabKingsIPL ??#RRvPBKS pic.twitter.com/7gdcjM9xQF
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2021
Published On - Apr 12,2021 11:42 PM