RR vs RCB Playing XI IPL 2022: राजस्थानला नमवण्यासाठी बँगलोरच्या संघात बदल? जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. राजस्थानचा संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर आरसीबीचा दोन सामन्यांत एक विजय आ

RR vs RCB Playing XI IPL 2022: राजस्थानला नमवण्यासाठी बँगलोरच्या संघात बदल? जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 सामना होणार.Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:39 PM

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) मध्ये मंगळवारी अशा दोन संघांमध्ये सामना होत आहे जे या हंगामात खूप मजबूत संघ मानले जात आहेत. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. राजस्थानचा संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर आरसीबीचा दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवासह सातव्या स्थानावर आहे. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्याचवेळी बंगळुरूचा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून आज आपला तिसरा सामना खेळणार आहे. राजस्थानने मुंबईविरुद्ध ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यानंतर राजस्थानची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

राजस्थानच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची फलंदाजी खूपच मजबूत दिसते. मुंबईविरुद्ध जॉस बटलरने शानदार शतक झळकावले. देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसनही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचवेळी शिमरॉन हेटमायरने खालच्या क्रमांकावर गेल्या दोन सामन्यांमध्ये तुफानी खेळी केली आहे. राजस्थान या सामन्यात बदल करू शकतो.आतापर्यंत त्यांनी फक्त तीन परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. या सामन्यात संघ व्यवस्थापन रियान परागला बाहेर बसवून रॅसी वान डर डुसेंला संधी देऊ शकतं.

असा असेल बंगळुरूचा संघ

ग्लेन मॅक्सवेल बंगळुरू संघात सामील झाला आहे परंतु त्याच्या उपलब्धतेबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. मॅक्सवेल खेळला तर शेरफाने रदरफोर्डला बाहेर बसावं लागेल. तर उर्वरित संघात अन्य कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

अशी आहे राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रसी व्हॅन डर डुसेन, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड/ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

इतर बातम्या

IPL 2022: Mumbai Indians ने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली, ज्याला सोडलं, त्यानेच घातला धुमाकूळ

Ruturaj Gaikwad CSK IPL 2022: चेन्नईच्या स्टारची अपयशाची हॅट्ट्रिक, मैदानावर 4 चेंडूंपेक्षा जास्त टिकणं झालं कठीण

IPL 2022 points table : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, पंजाबचा मोठा विजय, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.