जयपूर | राजस्थान रॉयल्स टीमचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 7 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात मोठा कारनामा केला. युझवेंद्र चहल याने हैदराबादच्या 4 फलंदाजांना आऊट केलं. यासह चहलने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. चहल आता आयपीएलमध्ये संयुक्तरित्या सर्वात जास्त विकेटस घेणारा गोलंदाज ठरला आहे. विशेष बाब म्हणजे या यादीच चहलचं नाव आघाडीवर आहे. कारण त्याने कमी सामन्यांमध्ये या सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
त्याआधी सर्वात जास्त विकेट्सचा विक्रम हा ड्वेन ब्राव्हो याच्या नावावर होता. मात्र चहलने बरोबरी केली आहे. आता चहल आणि ब्राव्हो या दोघांच्या नावावर प्रत्येकी 183 विकेट्सची नोंद आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत ड्वेन ब्राव्हो हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. तर उर्वरित 4 हे फिरकीपटू आहेत.
युझवेंद्र चहल -183* विकेट्स
ड्वेन ब्राव्हो – 183 विकेट्स
पीयूष चावला – 174 विकेट्स
अमित मिश्रा – 172 विकेट्स
आर अश्विन – 171 विकेट्स
चलाख चहल
? stuff! ?
PS: One away from creating history. ? pic.twitter.com/Z9PZQ0Najd
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2023
चहलचा आयपीएल रेकॉर्ड जबरदस्त आहे. चहलने 142 सामन्यांमध्ये 8.08 इकॉनॉमी रेटने आणि 19.41 च्या एव्हरेजने 183 विकेट्स घेतल्या आहेत. चहल राजस्थान रॉयल्स आधी 2014-2021 या कालावधीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या गोटात होता. चहलने आरसीबीसाठी 113 मॅचमध्ये 139 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे चहल आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.तसेच राजस्थान टीममध्ये 2022 पासून ते आतापर्यंत चहलने 44 विकेट्स घेतल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 214 धावा ठोकल्या. राजस्थानकडून जॉस बटलर याने 95, संजू सॅमसन याने 39 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या. त्यानंतर हैदराबाद बॅटिंगसाठी आली. चहलने हैदराबादला 4 झटके दिले. मात्र त्यानंतरही हैदराबादने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 41 धावा करत सामना जिंकला.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.